आयडियाची कल्पना तर बघा! भातशेतीला सोडचिठ्ठी देत सुधारित शेतीची कास; शेतकरी मोगऱ्याने मालामाल

रखमाजी सुपारे
Sunday, 25 October 2020

एकरी भाताचे उत्पन्न १२ ते १५ हजारांपर्यंत मिळते. मात्र फूलशेतीने या तरुण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले. दिवाळीच्या तोंडावर दररोज फूल (कळी) तोडणीची लगबग सुरू असून, आदिवासी शेतकऱ्यांनी विकसित तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

नाशिक : (पेठ) आदिवासी भागातील भात, नागली, वरई ही मुख्य पिके दर वर्षी कधी पाऊस जास्त झाला तर कधी पाऊस कमी झाला, अशा एक ना अनेक कारणांनी शेतकऱ्यांची फसवणूक होत आर्थिक खाईत लोटले जात. मात्र पारंपरिक भातशेतीला सोडचिठ्ठी देत सुधारित शेतीची कास धरत अतिदुर्गम भागातील प्रयोगशील शेतकरी अरुण पागी व केशव कुवर यांनी फूलशेती फुलवत लाखोंचे उत्पन्न मिळविल्याने ‘भाताने फसविले, मोगऱ्याने फुलविले’, अशी स्थिती आहे. 

अर्धा एकरात पाच बाय पाच अंतरावर लावली रोपे

दिवाळीच्या तोंडावर त्यांचा मोगरा नाशिकच्या बाजारपेठेत दरवळत आहे. शिंगदरी हे करंजाळी (ता. पेठ) पासून, १८ किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम डोंगरदऱ्यात वसलेले गाव. येथील भातशेती सतत बेभरवशाची. त्यामुळे येथील शेतकरी सातत्याने कर्जाचा डोंगर डोईवर मिरवतात. मात्र येथील तरुण अरुण आणि केशव यांनी श्रीमंत आदिवासी शेतकरी गटाच्या माध्यमातून आत्मा नाशिक व कृषी विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन खात्यामार्फत उपलब्ध मोगरा रोपांची लावगड अर्धा एकरात केली. चढ-उतराची जमीन आणि उन्हाळ्यातील कमी पाणी, शेतीच्या औषधांचा कमी खर्च असा मेळ बसवत त्यांनी अर्धा एकरात पाच बाय पाच अंतरावर लावलेल्या ९७५ ते एक हजार रोपे लहान मुलांप्रमाने सांभाळत जतन करून फुलविले. 

दिवाळीच्या तोंडावर फूल (कळी) तोडणीची लगबग सुरू

आजमितीस या अर्धा एकरात दररोज ३५ ते ४० किलो मोगऱ्याची फुले निघत असून, नाशिक बाजारपेठेत ८०० ते एक हजार रुपये किलो दराने विकले जात आहेत. पेठमधील मोगऱ्याचा सुंगध बाजारपेठेत दरवळत आहे. वर्षाचा हंगाम आठ महिन्यांचा असून, हंगामात साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकरी भाताचे उत्पन्न १२ ते १५ हजारांपर्यंत मिळते. मात्र फूलशेतीने या तरुण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले. दिवाळीच्या तोंडावर दररोज फूल (कळी) तोडणीची लगबग सुरू असून, आदिवासी शेतकऱ्यांनी विकसित तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

...असे मिळते उत्पन्न 

- प्रतिझाड प्रतिदिन उत्पादन - ८०० ते १००० ग्रॅम 
- हजार रोपांपासून मिळणारे उत्पन्न - ३५ ते ४० किलो 
- प्रतिकिलो भाव - ८०० ते १००० रुपये 
- एका झाडाचा उत्पादन कालावधी - ११ ते १२ वर्ष 
- हंगाम वर्षभरात सलग आठ महिने 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Peth, the farmer gets a lot of income from Mogra farming nashik marathi news