"माझ्यासोबत गाडीवर चल" असे सांगून तिला घरी घेऊन गेला..अन्..

bike ride.jpg
bike ride.jpg

नाशिक : सिन्नर येथील मापारवाडी रस्त्यावर शुक्रवारी (ता. 14) दुपारी साडेचारच्या सुमारास बारावीत शिकणाऱ्या महाविद्यालयीन युवतीवर जवळच राहात असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडितेने सिन्नर पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी संशयित आरोपी प्रमोद कासार (वय 23) यास अटक केली. त्याला शनिवारी (ता.15) न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

असा घडला प्रकार....

पीडित युवती गावाबाहेरील देवी रोडवरून जात असताना भगवती मंदिराजवळ संशयित प्रमोद त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून आला व मला तुझ्याशी बोलायचे आहे. माझ्यासोबत गाडीवर चल, असे सांगून तिला घरी घेऊन गेला. घरी गेल्यावर तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास बघून घेईन, असा दमही त्याने भरला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी तपास करीत आहेत.  

मुलगा आणि मुलगी या दोघांचेही समुपदेशन करण्याची गरज

स्त्रियांवरील अन्याय किंवा अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्य आहे ती जनजागृती. स्त्रियां व मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. आणि शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करून हे उपक्रम राबवले पाहिजेत. आजकाल प्रेमप्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मुलगा आणि मुलगी या दोघांचेही समुपदेशन करण्याची गरज आहे.

प्रेम हि भावना बाजूलाच आणि वासनेचा बाजार

प्रेम करणे हि वाईट गोष्ट नाही. परंतु प्रेमाच्या नावाखाली अश्लीलतेचा जो नाच चालू असतो, तो फार भयंकर आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात फारच आघाडीवर आहेत. अनेक तरुणांची जी प्रेम प्रकरणे चालू आहेत, ते आपल्या जोडीदाराबरोबर निर्जन स्थळी जावून अश्लील चाळे करतात (अपवाद आहेत.) हे निश्चितच सामाजिक हिताचे लक्षण नाही. प्रेम हि उदात्त भावना बाजूलाच राहते आणि वासनेचा बाजार सुरु होतो. अशा घटनांमध्ये बहुतांशी वेळा मुलीच बळी ठरतात. महिलांना आजच्या युगात दिले जाणारे स्थान हे खालच्या पातळीचे आहे. परंतु आता सरकारने केलेले कायदे हे फार महत्वाची भूमिका पार पडत आहेत.

खरच हा बदल होतो आहे का?

महिलांना दिले जाणारे स्थान आता हल्लीच्या काळात बदलत जात आहे. परंतु हा बदल होत असताना असे जाणवते कि, खरच हा बदल होतो आहे का? कारण आपण प्रत्येकजण म्हणतो कि, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार दिले गेले पाहिजेत. त्यांचे हक्क प्रदान केले पाहिजेत. पण खरे पाहिले असता पुरुषप्रधान संस्कृतीत मात्र महिलांना दुय्यमच स्थान आजही दिले जात असलेले दिसून येते. आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मास आली कि, तिला घरातुनच वागणूक व्यवस्थित मिळत नसल्याचे दिसते. हीच स्त्री आज पुरुषाच्या खांद्यास खांदा लाऊन प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करीत असतानाही तिला आजही पुरुषी अंहमपनाचा सामना करावा लागतोय. आजकालच्या लोकांच्या मानसिक विचारात बदल होण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com