esakal | पिंपळगांवकरांना विकासाबाबत दिलेला शब्द पुर्ण करणार - आमदार बनकर
sakal

बोलून बातमी शोधा

deelip b.png

सरपंच अलका बनकर अध्यक्षस्थानी होत्या. मविप्रचे माजी संचालक विश्‍वास मोरे, उपसरपंच अश्‍विनी खोडे प्रमुख पाहुणे होते. आमदार बनकर म्हणाले, की निफाड मतदारसंघाबरोबरच कर्मभूमी पिंपळगावमध्येही आमदारपदाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणणार आहे.

पिंपळगांवकरांना विकासाबाबत दिलेला शब्द पुर्ण करणार - आमदार बनकर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : तीन वर्षांपूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पिंपळगावकरांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करण्यास बांधील आहे. विकासकामांच्या लोकार्पणानिमित्त वचनपूर्तीकडे पाऊल पडत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणता येणार असून, पाच कोटी रुपयांच्या क्रीडांगणासह रचनात्मक कामे पिंपळगावात उभारणार असल्याची ग्वाही आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

आमदारपदाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणणार

पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिवाजीनगरमध्ये उभारलेल्या ५२ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. सरपंच अलका बनकर अध्यक्षस्थानी होत्या. मविप्रचे माजी संचालक विश्‍वास मोरे, उपसरपंच अश्‍विनी खोडे प्रमुख पाहुणे होते. आमदार बनकर म्हणाले, की निफाड मतदारसंघाबरोबरच कर्मभूमी पिंपळगावमध्येही आमदारपदाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणणार आहे. सुरेश खोडे, भाजपचे युवा नेते सतीश मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. गटारगंगेच्या ठिकाणी उद्यान उभारून नंदनवन फुलविले. (स्व.) राजेंद्र मोरे असे उद्यानाचे नामकरण केल्याने आनंद अधिक असल्याचे रवींद्र मोरे, संजय मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

तत्पूर्वी शिवाजीनगरमधील अंतर्गत रस्ते, उद्यान व अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. या वेळी बाळासाहेब बनकर, रामकृष्ण खोडे, राजेंद्र विधाते, नारायण पोटे, लक्ष्मण खोडे, उल्हास मोरे, चंद्रकांत राका, अरुण चव्हाणके, चंद्रकांत कुशारे, प्रकाश देशमुख, संपतराव मोरे, सतीश देशमाने, सुहास शिंदे, दिनेश पवार आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी एल. जे. जंगम आदी उपस्थित होते.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी