धक्कादायक! नशेत सैन्यदलाच्या जवानाकडून 'हे' काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

भद्रकाली पोलिस ठाण्यातील शिपाई दीपक सखाराम पाटील व सुधीर चव्हाण यांना गुरुवारी रात्री बीट मार्शलची ड्यूटी होती. मध्यरात्रीनंतर सव्वाच्या सुमारास दोघे शालिमार भागातून गस्त घालत होते. त्या वेळी खडकाळी सिग्नलजवळ रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची एक कार (जेएच 01, जी 2698) संशयितरीत्या उभी असल्याची त्यांना दिसली. जवळ जाऊन पाहिले असता, सैन्यदलातील निवृत्त सुभेदार रोहित प्रल्हाद दापूरकर (वय 43, रा. हिरावाडी) आणि देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरीचे सुभेदार मन्ना डे (43, रा. देवळाली) हे दोघे मद्याच्या नशेत कारमध्ये बसलेले होते. त्यानंतर...

नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील शिपाई दीपक सखाराम पाटील व सुधीर चव्हाण यांना गुरुवारी रात्री बीट मार्शलची ड्यूटी होती. मध्यरात्रीनंतर सव्वाच्या सुमारास दोघे शालिमार भागातून गस्त घालत होते. त्या वेळी खडकाळी सिग्नलजवळ रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची एक कार (जेएच 01, जी 2698) संशयितरीत्या उभी असल्याची त्यांना दिसली. जवळ जाऊन पाहिले असता, सैन्यदलातील निवृत्त सुभेदार रोहित प्रल्हाद दापूरकर (वय 43, रा. हिरावाडी) आणि देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरीचे सुभेदार मन्ना डे (43, रा. देवळाली) हे दोघे मद्याच्या नशेत कारमध्ये बसलेले होते. त्यानंतर...

असा घडला प्रकार...

भद्रकाली पोलिस ठाण्यातील शिपाई दीपक सखाराम पाटील व सुधीर चव्हाण यांना गुरुवारी रात्री बीट मार्शलची ड्यूटी होती. मध्यरात्रीनंतर सव्वाच्या सुमारास दोघे शालिमार भागातून गस्त घालत होते. त्या वेळी खडकाळी सिग्नलजवळ रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची एक कार (जेएच 01, जी 2698) संशयितरीत्या उभी असल्याची त्यांना दिसली. जवळ जाऊन पाहिले असता, सैन्यदलातील निवृत्त सुभेदार रोहित प्रल्हाद दापूरकर (वय 43, रा. हिरावाडी) आणि देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरीचे सुभेदार मन्ना डे (43, रा. देवळाली) हे दोघे मद्याच्या नशेत कारमध्ये बसलेले होते. त्यांची चौकशी केली असता, त्यातील चालकाने  चव्हाण यांना मारहाण केली. श्री. पाटील यांनी त्यांना चारचाकीसह पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करत जबरदस्तीने त्यांचे चारचाकीतून अपहरण केले व सारडा सर्कलच्या दिशेने जोरात वाहन घेऊन पळ काढला. पाथर्डी फाट्यामार्गे देवळाली कॅम्पकडे त्यांना नेण्याचा दोघांचा प्रयत्न होता. चव्हाण यांनी याबाबत पोलिस ठाण्यात माहिती दिली. 

मध्यरात्री दीड तासांचा थरार...

दरम्यान, पाटील यांनी त्यांच्याकडील वॉकीटॉकीवरून कंट्रोल रूमशी संपर्क साधत, दोन जण आपले अपहरण करून देवळाली कॅम्पकडे नेत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा थरार सुरू झाला. त्यांनी दीड तास चारचाकीचा पाठलाग केला. ठिकठिकाणी नाकाबंदी केली. देवळाली कॅम्प येथील नाका क्रमांक चारवर देवळाली कॅम्प पोलिसपथक आणि उपनगर पोलिसपथकाने नाकाबंदी करत चारचाकीसह दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी संशयितांसह चारचाकी घेऊन भद्रकाली पोलिस ठाणे गाठले. अपहरण झालेले पाटील यांना पोलिस उपनिरीक्षक जयश्री अनवणे यांनी पोलिस ठाण्यात आणले. 
 
सैन्यदलाकडून चौकशी 
घडलेल्या प्रकारची माहिती सैन्यदलातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी अधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठले. सैन्यदलाच्या संशयित कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून घडलेल्या प्रकारची माहिती घेतली, तसेच भद्रकाली पोलिस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. 

VIDEO : "संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर" - शरद पवार

एक दिवसाची पोलिस कोठडी

मद्याच्या नशेत असलेल्या सैन्यदलाच्या जवानाने एका पोलिस कर्मचाऱ्यास ड्यूटीवर असताना मारहाण करत चारचाकीतून अपहरण केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 17) उघडकीस आला. दरम्यान, संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी गुरुवारी (ता. 17) मध्यरात्रीनंतर दीड तास शहर पोलिसांचा थरार सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. 

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

क्लिक करा > "माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा"..तिने नकार देताच..    

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police abducted by drunk army soldier Nashik Marathi News