महामार्गावर लूटमार करणाऱ्यांच्या घोटी पोलोसांनी आवळल्या मुसक्या  

गोपाळ शिंदे
Tuesday, 29 September 2020

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनधारक यांसह प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना घोटी पोलिसांना यश आले आहे. या टोळक्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल सल्याचे समोर आले आहे. हे सराईत गुन्हेगार महामार्गावर वाहनधारकांना अडवून धारदार शस्त्र अथवा तलवार-चाकूचा धाक दाखवून जखमी करून लुटमार करत असे. यामुळे भयभीत झालेल्या वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.

नाशिक / घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनधारक यांसह प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना घोटी पोलिसांना यश आले आहे. या टोळक्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल सल्याचे समोर आले आहे. हे सराईत गुन्हेगार महामार्गावर वाहनधारकांना अडवून धारदार शस्त्र अथवा तलवार-चाकूचा धाक दाखवून जखमी करून लुटमार करत असे. यामुळे भयभीत झालेल्या वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.

घोटी पोलिसांनी कसली कंबर

 सराईत गुन्हेगारांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी घोटी पोलिसांनी कंबर कसली आहे. नगर जिल्ह्यातून सिमेंट पाईप मुंबई येथे ट्रक ( एमएच 17,टी 8613 ) मुंबई-नाशिक महामार्गावरून घोटी शिवारातून जात असतांना पहाटे 4.30 दरम्यान लघुसंखेसाठी थांबले होते. चालक संतोष बाबासाहेब चव्हाण ( वय 31 ) व क्लिनर मारुती कांबळे (वय 27) यांच्यावर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच सराईत गुन्हेगारांनी तलवारीचा धाक दाखवत पैस्याची मागणी केली. चालक व क्लिनर यांनी त्यास विरोध केल्याने सुरवातीला लाथाबुक्यांनी व नंतर चव्हाण यांच्या डोक्यात लोखंडी गज मारत जखमी केले.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पेट्रोलिंगवर जातांना लुटीचा प्रकार लक्षात

खिशातील रोख रक्कम तीन हजार व मोबाईल घेत कांबळे यांच्या खिशातील पाच हजार व मोबाईल असा एकूण दहा हजार रुपयांची लुट करत पळ काढला. पहाटेच्या दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे,उपनिरीक्षक मोहित मोरे हे आपल्या पथकासह पेट्रोलिंगवर जात असतांना त्यांच्या लक्षात लुटीचा प्रकार आल्यावर, त्यांनी चालक-क्लिनर यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. पळून जाणा-या सराईतांना पथकातील पोलिसांनी पकडले यातील संशयित आरोपी अर्जुन रंगनाथ खेताडे ( वय 28 ) रा. दत्त मंदिर एक्सल पाॅईऩट अंबड नाशिक याला पकडल्यावर खाकीचा दणका देताच इतर सहकाऱ्यांची नावे सांगितले.

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

तीन दिवसांची कस्टडी

पोलीस हवालदार भास्कर महाले, प्रकाश कासार,धर्मराज पारधी,गृहरक्षक दलाचे बाळासाहेब लगड,यांनी उर्वरित संशयित निलेश गणेश भगत ( वय 24 ) आकाश रंगनाथ शेणे ( वय 26 ) रा. घोटी सांडूनगर सुरज कचोरीया ( वय 29 ) चिंचोळे घरकुल अंबड, नाशिक यांच्या मुसक्या आवळल्या, दास हा अंधाराचा फायदा घेत एक फरार झाला. दिवाणी व फौजदारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कस्टडी सुनावली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested robbers on the highway nashik marathi news