शेतकऱ्यांना गंडविणारा व्यापारी गजाआड; पंचवटी पोलिसांनी ठाण्यात आवळल्या मुसक्या 

विनोद बेदरकर
Thursday, 10 December 2020

कांद्याचा व्यापारी असल्याचे भासवून मटाने (ता. देवळा ) येथील शेतकऱ्यांच्या ६० गोणी कांदे खरेदी करुन पैसे न देताच फरार झालेल्या इजाज उस्मान मन्सुरी (वय ५६, दुधबाजार काजीपुरा) याला पंचवटी पोलिसांनी ठाण्यात पकडण्यात यश मिळविले आहे.

नाशिक :  कांद्याचा व्यापारी असल्याचे भासवून मटाने (ता. देवळा ) येथील शेतकऱ्यांच्या ६० गोणी कांदे खरेदी करुन पैसे न देताच फरार झालेल्या इजाज उस्मान मन्सुरी (वय ५६, दुधबाजार काजीपुरा) याला पंचवटी पोलिसांनी ठाण्यात पकडण्यात यश मिळविले आहे. संशयिताने आतापर्यत मालेगाव, सटाणा, कन्नड, औरंगाबाद अशा ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा शेतीमाल घेउन गंडविल्याचे पुढे आले आहे. 

मटाणे (ता. देवळा) येथील नानाजी निंबा साळवे (वय ५८) यांनी १८ नोव्‍हेंबरला दुचारी पंचवटीतील शरदचंद्र पवार मार्केटमध्ये २९ क्विंटल ४५ किलो (६० गोण्या) कांदा विक्रीसाठी आणले होते. बाजार समितीत इजाज अन्सारी नावाच्या व्यापाऱ्याने २७ रुपये किलोने कांदे खरेदी करीत प्रत्यक्षात २० रुपयाने विक्री करुन त्याचे ५८ हजार ५०० रुपये शेतकरी नानाजी साळवे यांना न देता पळून गेला.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळल

आतापर्यत अनेक शेतकऱ्यांना फसवल्याचे उघड

याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी स्वतः पंचवटी पोलिसांना फोन करुन शेतकरी फसवणूकीच्या प्रकरणाबाबत गांर्भीयाने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला. त्याचा मोबाईल क्रमांकावरुन त्‍याचा माग काढतांना तो गुजरात, मुंबई, ठाणे, भिवंडी असा सतत बदलत असल्याने त्याच्यावर लक्ष ठेवीत काल त्याला भिंवडीत ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत त्याचे खरे नाव इजाज उस्मान मन्सुरी असून त्याने आतापर्यत मालेगाव, सटाणा, कन्नडसह ठिकठिकाणी गंडा घातल्याचे पुढे आले आहे. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested a trader who cheated farmers nashik marathi news