esakal | धक्कादायक! पोलिसांना संशय होताच...पण, वाहनाची झडती घेतली असता 'हे' काय निघाले?
sakal

बोलून बातमी शोधा

tempo.jpg

शनिवारी (ता. 6) संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास विंचूर चौफुली जवळून एक टेम्पो जात होता. त्या टेम्पोला (एमएच 20, ईजी 4495) पोलिसांनी अडविले...अन् झडती घेतली तर धक्काच...टेम्पोत जे काही होते ते अंगावर काटा आणणारे होते...

धक्कादायक! पोलिसांना संशय होताच...पण, वाहनाची झडती घेतली असता 'हे' काय निघाले?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (येवला) शनिवारी (ता. 6) संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास विंचूर चौफुली जवळून एक टेम्पो जात होता. त्या टेम्पोला (एमएच 20, ईजी 4495) पोलिसांनी अडविले...अन् झडती घेतली तर धक्काच...टेम्पोत जे काही होते ते अंगावर काटा आणणारे होते...

असा आहे प्रकार

शनिवारी (ता. 6) संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास विंचूर चौफुली येथे जनावरांचे हाडे व शिंगांची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो येवला पोलिसांनी पकडला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील दोन लाख 21 हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. नाशिक येथून टेम्पो (एमएच 20, ईजी 4495) वाहनातून जनावरांची हाडे व शिंगांची बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण व पोलिसांनी विंचूर चौफुली येथे सापळा रचत संशयित टेम्पो अडवून तपासणी केली असता त्यात हाडे व शिंगे आढळून आले. 

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

याप्रकरणी पोलिसांनी वैजापूर येथील शेख शौकत नुरमोहम्मद (30) व याकूब साबीर कुरेशी (24 ) यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडील दोन लाख 21 हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता

go to top