बालहट्टच तो! अखेर पोलीसकाकांनी पूर्ण केलीच चिमुरडीची 'ती' विनंती!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

एरव्ही गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारी घटनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे टीकेचे धनी ठरणारे पोलिस चिमुकल्यांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. एका दहा वर्षांच्या चिमुरडीचा बालहट्ट पोलीस काकांनी पुरविलाच. काय होती त्या चिमुरडीचाी मागणी?

नाशिक / इंदिरानगर : एरव्ही गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारी घटनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे टीकेचे धनी ठरणारे पोलिस चिमुकल्यांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. एका दहा वर्षांच्या चिमुरडीचा बालहट्ट पोलीस काकांनी पुरविलाच. काय होती त्या चिमुरडीचाी मागणी?

काय घडले वाचा?

सिद्धी आणि पंकज चित्ते चेतनानगर येथील शीतलवन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या लहान सायकली चोरट्याने लांबविल्या होत्या. विशेष म्हणजे पंकजच्या दोन सायकली होत्या. त्यात सिद्धीची सायकल नवी कोरी होती. त्यामुळे ती एकदम खट्टू झाली. अखेर वडिलांसह तिने मंगळवारी (ता. 16) पोलिस ठाणे गाठत माझी सायकल शोधून द्या, अशी विनंती केली. वरिष्ठ निरीक्षक माईनकर यांनी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक एस. जी. जगदाळे, राजेश निकम, रियाज शेख, भगवान शिंदे आणि दीपक पाटील यांना ही बाब गांभीर्याने घेण्यास सांगितले. दोन तासांत शिंदे यांना राजीवनगर भागात सायकली एका पडक्‍या घरात ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जात सायकली ताब्यात घेतल्या. ही गोड बातमी या दोन्ही बालकांना दिली. बुधवारी (ता. 17) दुपारी त्या सायकली त्यांना सुपूर्द करण्यात आल्या. आनंदी झालेल्या बालकांनी सोबत आणलेली मिठाई सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देत आपला आनंद साजरा केला. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

अवघ्या काही तासांतच शोधली सायकल

सोसायटीतून चोरीला गेलेली सायकल शोधून द्या ही मागणी घेऊन थेट पोलिस ठाण्यात पोचलेल्या सिद्धी घुगे या दहावर्षीय बालिकेची तक्रार वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी गांभीर्याने घेतली. अवघ्या काही तासांत ही सायकल शोधून देत एक प्रकारे तिचा बालहट्ट पुरविला. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police given stolen bicycles to children nashik marathi news