बापरे! संरक्षण देणाऱ्यांकडूनच झाला होता कोविड सेंटरवर 'तो' हल्ला...धक्कादायक खुलासा!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

रविवारी रात्री कोविंड केअर सेंटरवर शिवीगाळ करून दगडफेक करणारा संशयित हा सामान्य नागरिक नसून माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रश्‍नी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना पत्र देत केली आहे.

नाशिक / येवला : रविवारी रात्री कोविंड केअर सेंटरवर शिवीगाळ करून दगडफेक करणारा संशयित हा सामान्य नागरिक नसून माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रश्‍नी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना पत्र देत केली आहे.

त्यादिवशी कोविड सेंटरवर हल्ला करणारा सामान्य नागरिक नव्हता...

नगरसूल येथील कोविड केअर सेंटरवर रविवारी नागडे येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात ६५ वर्षीय आजींना मधुमेहासह हृदयविकाराचा त्रास असल्याने आरोग्य यंत्रणा कोविडच्या निकषानुसार औषधोपचार करत होती. त्यादरम्यान त्यांचा रात्री साडेआठला मृत्यू झाला, मात्र तासाभरात केंद्रावर येऊन महिलेच्या मुलाने गोंधळ घालत अधिकारी, कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत डॉक्टरांवर दगडफेक केली.
याबाबत माहिती घेतली असता गोंधळ घालणारी व्यक्ती पोलिस दलात अधिकारी असून, तो सध्या जळगाव शहरात कार्यरत आहे. या प्रकरणी अद्यापही कारवाई न झाल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी लीना बनसोड यांनी नगरसूल प्रकरणी तत्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पत्राद्वारे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे केली आहे.

गोंधळ घालूनही अभय?
दरम्यान, नगरसूल येथे गोंधळ सुरू होता तेव्हा स्थानिक पोलिसही येथे आले होते. मात्र त्यांनी कायदेशीर कारवाईकडे कानाडोळा करत जाऊ द्या, अशी भूमिका घेतल्याने तालुका आरोग्याधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड व येथील आरोग्य विभागाने वरिष्ठांना हा प्रकार पत्राद्वारे कळविला. त्यामुळे बनसोड यांनी थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!
 

दोषीवर कारवाई होऊन न्याय मिळावा

आम्ही स्वतःला धोक्यात घालून उपचार करत आहोत. असे असूनही असे आरोप व हल्ल्याचे प्रकार होत असतील तर चुकीचे आहे. त्यामुळे दोषीवर कारवाई होऊन आम्हाला न्याय मिळावा व यापुढे उपचार केंद्राला सुरक्षा पुरवावी, अशी आमची मागणी आहे.-डॉ. हितेंद्र गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी, येवला

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

संबंधितावर कारवाई करण्याची मागणी

रविवारी रात्री नगरसूल येथील कोविंड केअर सेंटरवर शिवीगाळ करून दगडफेक करणारा संशयित हा सामान्य नागरिक नसून पोलिस दलातील अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रश्‍नी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना पत्र देत केली आहे.

संपादन - ज्योती देवरे
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police officer who attacked CCC at Nagarsul in Nashik marathi news