esakal | पोलीस अधिकारी बदल्या; जिल्ह्यात नवीन अधिकाऱ्यांचे आगमन 
sakal

बोलून बातमी शोधा

sangram singh.jpg

 गृह विभागाने भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी व पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, उपविभाग अधिकऱ्यांच्या पदोन्नती व बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधिकारी बदल्या; जिल्ह्यात नवीन अधिकाऱ्यांचे आगमन 

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : गृह विभागाने भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी व पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, उपविभाग अधिकऱ्यांच्या पदोन्नती व बदल्या करण्यात आल्या आहेत. शहर आयुक्तालयात उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या जागी उपायुक्त म्हणून संग्रामसिंह निशानदार बदलून येणार आहेत. 

जिल्ह्यात नवीन अधिकाऱ्यांचे आगमन 
जिल्ह्यात नवीन पोलिस अधिकाऱ्यांचे आगमन होणार आहे. सहाय्यक पोलिस आयुक्तपदी मोहन ठाकूर, दीपाली खन्ना, सीताराम गणपत गायकवाड, शेख सोहेल नूरमोहम्मद बदलून येणार आहेत. महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या सहाय्यक संचालकपदी राजेश दुदलवार यांची नियुक्ती झाली आहे. निफाडच्या पोलिस उपविभागीय अधिकारीपदी सोमनाथ तांबे, कळवण उपविभागीय पोलिस अधिकारीपदी अमोल गायकवाड, ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारीपदी अर्जुन भोसले, तर मालेगाव अपर पोलिस अधीक्षकपदी चंद्रकांत खांडवी यांची बदली झाली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, पोलिस आयुक्त दीपक पांडे व जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या मदतीला आता नवीन अधिकाऱ्यांची फळी असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासन कारभार बदलणार आहे. यामुळे नवा गडी नवा राज पाहण्यास मिळणार आहे. 

>>> नाशिकच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

>>> नाशिकच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा