"श्रेय लाटायचे की वाटायचे?" विश्वास नांगरे पाटलांच्या उदात्त वृत्तीचे सर्वत्र होतय कौतुक

प्रमोद दंडगव्हाळ
Saturday, 15 August 2020

एखाद्या कामाचे श्रेय लाटण्याचा पेक्षा, त्या कामाचे श्रेय दुसऱ्याला कसे देता येईल या उदात्त वृत्तीचे  मूर्तीमंत उदाहरण पुन्हा एकदा नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या एका कृतीतून बघायला मिळाल्याने उपस्थित लोकप्रतिनिधींसाठी ते एक चांगले उदाहरण बनू पाहत आहे.

नाशिक / सिडको : एखाद्या कामाचे श्रेय लाटण्याचा पेक्षा, त्या कामाचे श्रेय दुसऱ्याला कसे देता येईल या उदात्त वृत्तीचे  मूर्तीमंत उदाहरण पुन्हा एकदा नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या एका कृतीतून बघायला मिळाल्याने उपस्थित लोकप्रतिनिधींसाठी ते एक चांगले उदाहरण बनू पाहत आहे.

नागरिकांमध्ये सध्या याची मोठ्या प्रमाणात चर्चा

नागरिकांमध्ये सध्या याची मोठ्या प्रमाणात चर्चा एकाला मिळत आहे. अंबड पोलीस ठाणे अंतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवन नगर पोलीस चौकीचे उद्घाटन एका सामान्य नागरिकाचा दहा वर्षाचा मुलगा सोहम सम्राट भावसार याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, आ. सीमा हिरे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक निलेश ठाकरे , पोलीस उपायुक्त विजय खरात, अमोल तांबे,  लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले,  अंबड पोलीस स्टेशन चे  पोलीस निरीक्षक श्रीकांत निबाळकर, प्रशांत नागरे आदी  उपस्थित होते.

\PHOTOS : देश स्वातंत्र्य झाला.. पण आम्ही पारतंत्र्यातच? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व दिनीच विहिरीत खाटेवर बसून आंदोलन

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police station was inaugurated by a ten year old boy nashik marathi news