बंदी असूनही बिंग फुटले..अन् दुसरीकडे पोलीस म्हणताएत "असे काही घडलेच नाही"

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 28 जानेवारी 2020

कुडे यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला असून, नाशिक जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेच्या 24 तासांनंतरही सिन्नरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांना माहिती नव्हती. जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीतून सिन्नर पोलिस ठाण्यास घटनेची माहिती रविवारी रात्रीच कळविली आहे. तरीही...

नाशिक : लोणारवाडी (ता. सिन्नर) येथे प्रजासत्ताकदिनी झालेल्या बैलांच्या तांगा शर्यतीत 65 वर्षीय वयोवृद्ध जखमी झाला. दिनकर पंढरीनाथ कुडे (वय 65, रा. मऱ्हळ बुद्रुक, ता. सिन्नर) असे जखमीचे नाव आहे. यामुळे बंदी असतानाही तांगा शर्यत घेतल्याचे बिंग फुटले. घटनेला 24 तास उलटूनही "असे काही घडलेच नाही' असा दावा करणारे पोलिस प्रकरण दडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बंदी असताना लोणारवाडीत तांगा शर्यत..

कुडे यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला असून, नाशिक जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेच्या 24 तासांनंतरही सिन्नरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांना माहिती नव्हती. जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीतून सिन्नर पोलिस ठाण्यास घटनेची माहिती रविवारी रात्रीच कळविली आहे. तरीही सिन्नर पोलिसांत अनधिकृत तांगा शर्यतीबाबत नोंद सोमवारी (ता. 27) सायंकाळपर्यंत नव्हती. यावरून पोलिसांकडून हे प्रकरण दडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर येत आहे. 

हेही वाचा > आईच निघाली उलट्या काळजाची..शेवटी मुलाने संतापात..​

पोलिसांकडून दडविण्याचा प्रयत्न 

लोणारवाडीमध्ये तांगा शर्यत होती. बैल उधळल्याने त्यात वडील (दिनकर कुडे) जखमी झाले. यात आपल्याला काही करायचे नाही. - महेश कुडे, जखमीचा मुलगा, मऱ्हळ 

हेही वाचा > रखडलेल्या कामांसाठी 185 कोटी - भुजबळ ​
.
लोणारवाडीत अशी कोणतीही तांगा शर्यत झालेली नाही. कोणालाही शर्यतीला परवानगी दिलेली नाही. पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही. -साहेबराव पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिन्नर 

तांगा शर्यत झाली असेल, तर ही बाब गंभीर आहे. याबाबत तत्काळ कारवाई केली जाईल. -डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police try to suppress case at lonarwadi Nashik Marathi News