एटीएममधून पैसे काढताना सावधान! कोरोनाच्या फैलावाची वाढली शक्यता  

bank atm.jpg
bank atm.jpg

नाशिक : बॅंकेचे एटीएम म्हटले की प्रत्येकाच्या जीवनाचा एक दैनंदिन भाग झाला आहे. कारण प्रत्येक नागरिकाला पैसे काढण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी एटीएमवर जावे लागते. बँकेत गर्दी करण्यापेक्षा बहुतांश जण एटीएमच्या माध्यमातून पैसे काढण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे शहरातील सर्व एटीएमवर गर्दी सतत गर्दी असते. तेथे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यासाठी काळजी घेणे आवश्यक ठरत आहे.

सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज

शहरातील प्रमुख बँकांकडून दिवसातून एकदा एटीएम सेंटर सॅनिटायइज केले जाते. मात्र, बहुतांश एटीएम केंद्रावर येणाऱ्या ग्राहकांना हात सॅनिटाइज करण्यासाठी सॅनिटायझरच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. शिवाय, एटीएम सेंटरचा दरवाजा, एटीएम, त्याचा बटणांना दररोज हजारो हातांचा स्पर्श होतो. शहरातील विविध बँकांच्या एटीएमवर दररोज शेकडो ग्राहकांचा वावर असून, त्या ठिकाणी ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. बँकांनी त्यांच्यासाठी एटीएमवर सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा धोका वाढला

एटीएममध्ये येणाऱ्या नागरिकांपैकी कोण कोरोनाबाधित किंवा कोण कोरोना विषाणूवाहक असेल सांगता येत नाही. त्यामुळे पाठोपाठ येणाऱ्या ग्राहकाला दरवाजा, बटणांना हात लावण्याशिवाय पर्याय नसतो. बोटांवर मोजण्याइतके ग्राहक हातमोजे घालून येतात. मात्र, बहुतांश जण सुरक्षेची कुठलीही काळजी न घेताच एटीएम सेंटरमध्ये शिरत असल्याने त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे आवश्यक
लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून फारसा धोका नाही, परंतु कोविड संसर्गित व्यक्ती एटीएममध्ये शिंकल्यास त्यापासून अनेकांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एटीएमचा वापर करताना प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वत:ला सॅनिटाइज करण्यासह मास्क लावणे, हातमोजे वापरणे आवश्यक आहे.

एटीएममध्ये जाताना ही काळजी घेणे आवश्यक

- नियमित आपले हात सॅनिटाइज करा

- एटीएमची बटणे दाबताना शक्यतो हातमोजे घाला

- सर्दी-ताप असल्यास एटीएम वापर टाळा

- एटीएम रुममधील इतर भागास स्पर्श टाळा

- एटीएम रुममध्ये इतर व्यक्ती असताना वापर टाळा

- शक्यतो डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com