esakal | हृदयद्रावक घटना.. गरम डांबरचा टॅंकर उलटून पोस्टमनचा होरपळून मृत्यू..तर दुचाकीस्वार जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

sinner death 1.jpg

घोटीकडून डांबर घेऊन येणारा टॅंकर सिन्नर शिवारात येताना शिवनदीच्या पुलाजवळ चालकाचा टॅंकरवरील ताबा सुटला. त्याच वेळी समोरून सिन्नर तालुक्‍यातील माळेगाव येथील पोस्टमन नंदू येत होते. समोरून अचानक आलेल्या टॅंकरखाली ते काही कळण्याच्या आत सापडले.

हृदयद्रावक घटना.. गरम डांबरचा टॅंकर उलटून पोस्टमनचा होरपळून मृत्यू..तर दुचाकीस्वार जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिन्नर : डांबर घेऊन येणारा टॅंकर चालकाचा टॅंकरवरील ताबा सुटला. त्याच वेळी समोरून सिन्नर तालुक्‍यातील माळेगाव येथील पोस्टमन नंदू येत होते. समोरून अचानक आलेल्या टॅंकरखाली ते काही कळण्याच्या आत सापडले. अन् मग...
 

अशी घडली घटना
घोटीकडून डांबर घेऊन येणारा टॅंकर (एमएच 46, बीएम 2467) सिन्नर शिवारात येताना शिवनदीच्या पुलाजवळ चालकाचा टॅंकरवरील ताबा सुटला. त्याच वेळी समोरून सिन्नर तालुक्‍यातील माळेगाव येथील पोस्टमन नंदू देवराम डमाळे (वय 55, रा. भाटवाडी) येत होते. समोरून अचानक आलेल्या टॅंकरखाली ते काही कळण्याच्या आत सापडले. यात टॅंकरमधील गरम डांबर त्यांच्यावर पडल्याने त्यांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर जखमी दुचाकीस्वाराचे नाव अमोल केरू चव्हाणके (वय 28, रा. शिवडे, ता. सिन्नर) असे आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने टॅंकर बाजूला करत डमाळे यांचा मृतदेह बाहेर काढला. तर टॅंकरचालक अपघातानंतर फरार झाला आहे. या प्रकरणी जखमी चव्हाणके यांनी फिर्याद दिली असून सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

सिन्नर - घोटी रस्त्यावर मंगळवारी (ता. 26) दुपारी तीनच्या सुमारास डांबराचा टॅंकर उलटून झालेल्या अपघातात सायकलस्वार पोस्टमनचा डांबरात होरपळून मृत्यू झाला, तर रस्त्यावरून जाणारा एक तरूण दुचाकीस्वार जखमी झाला. 

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन

go to top