
लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारी भाजी म्हणजे बटाटे. काही जणांसाठी ते जीव की प्राणच असते. तसेच बटाट्याचा वापर खाद्यपदार्थ सोडून मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये करतात. सगळ्या सीजनमध्ये बटाट्याची मागणी चढतीच असते. अशा बटाट्याची लागवड नांदगाव तालुक्यात कांदा पिकाला पर्याय म्हणून तसेच कमी खर्चात हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून होत आहे.
साकोरा(जि.नाशिक) : लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारी भाजी म्हणजे बटाटे. काही जणांसाठी ते जीव की प्राणच असते. तसेच बटाट्याचा वापर खाद्यपदार्थ सोडून मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये करतात. सगळ्या सीजनमध्ये बटाट्याची मागणी चढतीच असते. अशा बटाट्याची लागवड नांदगाव तालुक्यात कांदा पिकाला पर्याय म्हणून तसेच कमी खर्चात हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून होत आहे.
कमी खर्चात हमखास उत्पन्न देणारे पीक
अवकाळी पाऊस व निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदारोपांचे नुकसान झाले. तीन ते चार वेळेस कांदा बी टाकून अतिवृष्टी व रोगट हवामानामुळे कांद्याचे रोपच हाती आले नसल्याने पर्याय म्हणून व्यापारी पीक असलेल्या बटाटे पिकाकडे तालुक्यातील शेतकरी वळले आहेत. कांदा पिकापेक्षा कमी खर्च व चांगले उत्पन्न म्हणून तालुक्यात पन्नास ते साठ एकरवर बटाट्याची लागवड झाली आहे. बटाटा थंड हवामानातील पीक आहे. बटाटा पीक येण्यासाठी १६ ते २४ अंश सेल्सियस तापमान लागते. सुरवातीच्या काळात २४ अंश, तर पोषणीच्या काळात २० अंश सेल्सियस तापमान लागते. मध्यम ते हलक्या प्रतीच्या शेतीच्या ठिकाणी बटाट्याचे पीक चांगले येते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रब्बी हंगामात त्याची लागवड केली जाते. कांदा पिकाला पर्याय व कांदा पिकापेक्षा कमी खर्चात चांगले उत्पन्न घेण्याकडे तालुक्यातील शेतकरी बटाटा पिकाकडे वळू लागला आहे.
हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश
बटाटा पिकाचा एकरी खर्च
*बियाणे : सहाशे किलो चाळीस रुपये प्रमाणे २४ हजार रुपये
*कोंबडी खत : सहा हजार रुपये
*रासायनिक खते : सहा हजार रुपये
*मशागत व लागवड खर्च : पाच हजार रुपये
*फवारणी : चार हजार रुपये
*एकूण खर्च ४५ हजार रुपये
मिळणारे उत्पन्न
एकरी शंभर ते १२० क्विंटल
बाजारभाव : पंधरा ते सतरा रुपये किलो
एकरी : खर्च वजाजाता निव्वळ उत्पन्न सव्वा लाख
हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप
पन्नास हजार रुपयांचे कांदा बियाणे घेऊन निसर्गाच्या लहरीपणामुळे कांद्याचे रोप हाती आले नाही. त्याला पर्याय म्हणून तीन एकरमध्ये बटाटा लावला आहे. मला खर्च वजाजाता तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतील, अशी आशा आहे. - रवींद्र बोरसे, बटाटा उत्पादक, साकोरा
परिसरात बटाट्यासारखे नवखे पीक घेताना आनंद होत आहे. चांगले उत्पन्न मिळाल्यावर परिसरातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त क्षेत्रात बटाट्याची लागवड करून शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देण्याचा मानस आहे. - पितांबर बोरसे, साकोरा