बटाट्याचे दर कडाडले! तरीही नागरिकांकडून बटाट्याची मागणी अधिक

दीपक आहिरे
Monday, 7 December 2020

 यापूर्वी साधारण ३० ते ३५ किलो बटाट्याचे भाव असायचे. भाजीपाला व फळभाज्या महागल्या, की बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण सद्यःस्थितीत बटाट्याची बाजारपेठ बदलण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : यापूर्वी साधारण ३० ते ३५ किलो बटाट्याचे भाव असायचे. भाजीपाला व फळभाज्या महागल्या, की बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण सद्यःस्थितीत बटाट्याची बाजारपेठ बदलण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

बटाट्याची बाजारपेठ बदलण्याचे चित्र

हिरवा भाजीपाला व फळभाज्यांच्या तुलनेत स्वस्त असलेल्या बटाट्याचे भाव घाऊक बाजारात कडाडले असून, बटाटा सध्या ६० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात बटाट्याचा वापर झाला. नवा माल येण्यास उशीर असल्याने भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नेहमी हिरवा भाजीपाला व फळभाज्यांच्या तुलनेत बटाट्याचे भाव कमी राहतात. मार्चपासून कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू झाला. हिरवा भाजीपाला, फळभाज्या लोकांपर्यंत पोचत नव्हत्या. त्यामुळे बटाट्याचा वापर वाढला असून, जुने उत्पादन आता संपत आले आहे. 

लॉकडाउन काळात वापर वाढल्याने टंचाई ​

निफाड तालुक्यात इंदूर, आग्रा, उत्तर प्रदेशातून बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. पण सद्यःस्थितीत बटाट्याची मागणी तेवढा पुरवठा होत नाही. बटाट्याचा पुरवठा जवळपास निम्म्यावर आला. नवीन बटाटा येण्यास काही अवधी आहे. त्यामुळे ठोक बाजारात भाव ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. घाऊक बाजारात वाहतूक खर्च हमाली व इतर खर्च यांचा विचार करता ६० रुपये किलोने विक्री होत आहे. पिंपळगावच्या आठवडेबाजारात आज भाजीपाला व फळभाज्या स्वस्त आहेत. तुलनेत बटाटा कधी नव्हे एवढा महाग झाला आहे. नवे उत्पादन येत नाही तोपर्यंत दर खाली येणार नसल्याचे व्यापारी सांगतात. भाव वधारले असले तरी नागरिकांकडून बटाट्याची मागणी कमी होताना दिसत नाही. कारण उपवासाला साबूदाण्याची खिचडी, साबूदाणा वडे, भजी यात वापर होत असल्याने बटाट्याची मागणी कायम आहे. 

सध्या मागणीएवढा पुरवठा होत नसल्याने व चढ्या दराने बटाटा खरेदी करावा लागतो. खर्च वजा जाता किलोमागे पाच रुपये नफा म्हणून बटाट्याची विक्री किमान ६० रुपये किलोने करावी लागत आहे. -जनार्दन शिरसाठ, 
भाजीपाला विक्रेता 

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न  

गेल्या आठ दिवसांपासून बटाट्याचे भाव दुपटीने वाढ आहेत. पण दररोजच्या भाज्यांमध्ये बटाट्याचा वापर करावा लागतो. लॉकडाउननंतर हॉटेल व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असताना मेन्यूची दरवाढ करता येत नाही. -संजय शिंदे, संचालक, हॉटेल माखनचोर 

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: potato price increased nashik marathi news