अभियांत्रिकी सेवा पूर्व, संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय

अरुण मलाणी
Wednesday, 14 October 2020

वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्‍याने उमेदवारांकडून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. दरम्‍यान या तिन्‍ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्‍यामुळे एमपीएससीतर्फे जारी केलेल्‍या वेळापत्रकातील अन्‍य काही परीक्षांचे वेळापत्रकदेखील प्रभावित होण्याची भिती उमेदवारांकडून व्‍यक्‍त केली जात आहे. 

नाशिक : एसईबीसी आरक्षणाच्‍या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.११) नियोजित असलेली राज्‍यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलली होती. त्‍यानंतर नोव्‍हेंबरमध्ये होणार असलेल्‍या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्या आहेत. 

वारंवार परीक्षा पुढे ढकलण्याने उमेदवारांत नाराजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंगळवारी (ता.१३) या संदर्भातील सूचना जारी केली आहे. एमपीएससीतर्फे जारी केलेल्‍या परिपत्रकात म्‍हटले आहे, की १ नोव्‍हेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० आणि २२ नोव्‍हेंबरला नियोजित असलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब, संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात येत आहेत. प्रस्‍तुत परीक्षांच्‍या सुधारीत तारखा आगामी काळात जारी केल्‍या जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. दरम्‍यान या परीक्षा पुढे ढकलण्याच्‍या कारणाबद्दल कुठलीही बाब नमूद केलेली नाही.

हेही वाचा >  धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्‍याने उमेदवारांकडून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. दरम्‍यान या तिन्‍ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्‍यामुळे एमपीएससीतर्फे जारी केलेल्‍या वेळापत्रकातील अन्‍य काही परीक्षांचे वेळापत्रकदेखील प्रभावित होण्याची भिती उमेदवारांकडून व्‍यक्‍त केली जात आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre engineering service,Joint pre-exams postponed nashik marathi news