
कोविडची परिस्थिती व त्यामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे लग्नसराईचा गत हंगाम ठप्प झाला होता. याकाळात छोटेखानी लग्नसोहळे पार पडताना दिसले. परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असलेल्या विवाह समारंभाबाबत तरुणाईत उत्साह वाढला आहे.
पंचवटी (नाशिक) : कोविडची परिस्थिती व त्यामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे लग्नसराईचा गत हंगाम ठप्प झाला होता. याकाळात छोटेखानी लग्नसोहळे पार पडताना दिसले. परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असलेल्या विवाह समारंभाबाबत तरुणाईत उत्साह वाढला आहे. आपला विवाह हटके आणि अविस्मरणीय बनण्यासाठी प्री- वेडींग फोटोशूटपासून अन्य विविध नियोजन तरुणाईकडून आखले जाते आहे.
विविध नियोजन तरुणाईकडून
सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने साखरपुडा, विवाह सोहळ्यांसह स्वागत समारंभालाही मोठी गर्दी होऊ लागली आहे. या सोहळ्याच्या आठवणी आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी तरुण तरुणींमध्ये प्री- वेडिंग फोटोग्राफीसह व्हिडिओ शुटिंगला मोठी पसंती दिली जात आहे. त्यासाठी गंगापूर धरण परिसर असलेला बॅकवॉटरसह शहर परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांना भेट देताना फोटोशूट व व्हिडिओग्राफी केली जाते आहे. त्यामुळे या ठिकाणांवर लक्षणीय गर्दी बघायला मिळते आहे.
हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट
निसर्गरम्य लोकेशन्सवर भर; कोविडच्या पार्श्वभूमीवर घेतली जातेय काळजी
सोमेश्वर, तपोवन परिसरातही काहीजण त्यासाठी गर्दी करताना दिसून येतात. असे असले तरी सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, चित्रीकरणाद्वारे छायाचित्रकार, नवदांपत्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाते आहे. यात प्रामुख्याने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत कोरोनापासून बचावावर भर दिला जात आहे.
हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर