
येथे २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
नाशिक : येथे २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. आज रविवार (ता. २४) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटक संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेतला.
संमेलन अध्यक्ष निवडीच्या स्पर्धेत नारळीकरांसोबतच मराठी कथाकार भारत ससाणे यांचे नाव देखील चर्चेत होते. त्यामुळे संमेलनाध्यक्ष कोण असावे, याचा काय नेमका फैसला होणार याकडे मराठी सारस्वतांचे लक्ष लागले होते. अखेर चर्चेला ब्रेक लागला असून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर हे अध्यक्षपद भूषवणार आहे.
हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच