independence day 2020 : नाशिकच्या चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

Police  photos.jpg
Police photos.jpg

नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला यंदा नाशिकच्या चार पोलिस आधिकाऱ्यांना राष्ट्रपतीचे पदक जाहीर झाले आहे. पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम शंकर कोल्हे,  युनीट दोनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय लोंढे, नागरी संरक्षण विभागातील सहाय्यक पोलिस  उपनिरीक्षक पांडूरंग कावळे आणि शाम वेताळ यांचा समावेश आहे. 

डॉ.सिताराम शंकर कोल्हे- गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. कोल्हे हे लोणी (ता.पारनेर) येथील रहिवासी असून १९९२ च्या उपनिरीक्षकांच्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी क्रिमीनल सायकॉलॉजीत पीएचडी केली असून गुन्हेगारीविषयक चौदा संशेधन लेख प्रकाशित आहेत. त्यांना आतापर्यत ६०० बक्षिसे आणि ८५ प्रशस्तिपत्रासह पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहेत. गुन्हे शोध विभागात खून दरोड्यासह मैत्रेय सारख्या अनेक आर्थिक घोटाळ्याचे क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले. 

पोलिस उपनिरीक्षक विजय पोपटराव लोंढे - हे सिन्नर येथील असून मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण झाले आहे. शहर गुन्हे शाखेत कार्यरत असून त्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पदक जाहीर झाले आहे. ३५ वर्षाच्या सेवेत त्यांना ४२१ खून दरोड्यासह अनेक गंभीर गुन्ह्याची उकल केली आहे. बनावट धनादेश प्रकरणातील मोस्ट वॉन्टेंड फारुक कलकत्तेवाला याची टाळी, पत्नीचा खून करुन फरार असलेल्या पतीचा १७ वर्षानंतर शोध, एकतर्फी प्रेमातून अनिता एखंडे मुलीचा खूनाचा तपास, मुथुट फायनान्स अशा अनेक किचकट गुन्ह्याचा यशस्वी तपास केला आहे. 


सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग बाबूराव कावळे -  हे नागरी संरक्षण विभागात कार्यरत आहेत. १९८८ ला पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झालेल्या कावळे यांना मुख्यालय, पंचवटी,सरकारवाडा, अंबड, इंदिरानगर, आणि लाचलूचपत प्रतिबंधक विभागात काम  करतांना २६१ बक्षिसे आणि ०४ सन्मानपत्र मिळाले आहेत. जुनी चांदीची नाणे विल्हेवाट, घरफोड्याची उकल, युनियन बॅकेतील (गाझियाबाद,दिल्ली) येथील आर्थिक गुन्हेगारांचा शोध, हेमलता टॉकीज येथील गावठी बॉम्बचा स्फोटातून जीवे मारण्याच्या कटाचा उलगडा केला आहे. 

शाम गणपत वेताळ - नाशिक परिक्षेत्र येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक शाम गणपत वेताळ हेही नागरी संरक्षण विभागात कार्यरत असून ते मूळचे  पाटणे (ता.मालेगाव, जि.नाशिक) येथील आहेत. यापूर्वी ते नाशिक ग्रामीण पोलिस दलातील वाचक शाखेत कार्यरत होते. त्यांना आतापर्यत विविध उल्लेखनीय कामाबद्दल ३०० बक्षीस मिळाली आहेत.

संपादन - विनोद बेदरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com