esakal | संसर्गरोधक फॅबिफ्लू गोळ्या आता १०३ रुपयांना नव्हे...तर 'इतक्या' रुपयांना मिळणार!
sakal

बोलून बातमी शोधा

fabiflue.jpeg

समाधानकारक परिणाम आणि वाढती विक्री यामुळे किंमत कमी करणे शक्य झाले आहे, कारण एपीआय आणि फॉर्म्युलेशन या दोन्हींचे उत्पादन ग्लेनमार्कच्या भारतातील कारखान्यात होते आणि उत्पादनखर्चात होणाऱ्या बचतीचा फायदा ग्राहकाला मिळत असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. हे औषध ग्लेनमार्कच्या स्वतःच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

संसर्गरोधक फॅबिफ्लू गोळ्या आता १०३ रुपयांना नव्हे...तर 'इतक्या' रुपयांना मिळणार!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने आपल्या फॅबिफ्लू या संसर्गरोधक औषधाची परिणामकारकता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी हे औषध घेतलेल्या १००० रुग्णांची देशात विविध ठिकाणी ‘पोस्ट मार्केटिंग सर्व्हेलन्स’ पाहणी सुरू केली आहे. तसेच फॅबिफ्लूच्या किंमतीत २७ टक्के कपात केली असून, आता या औषधाची किंमत घटविण्यात आली आहे.

म्हणून किंमत कमी करणे शक्य...

समाधानकारक परिणाम आणि वाढती विक्री यामुळे किंमत कमी करणे शक्य झाले आहे, कारण एपीआय आणि फॉर्म्युलेशन या दोन्हींचे उत्पादन ग्लेनमार्कच्या भारतातील कारखान्यात होते आणि उत्पादनखर्चात होणाऱ्या बचतीचा फायदा ग्राहकाला मिळत असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. फॅबिफ्लूच्या किमतीत २७ टक्के कपात केली असून, आता या औषधाची किंमत एका गोळीला १०३ रुपयांवरून ७५ रुपये एवढी घटविण्यात आली आहे. हे औषध ग्लेनमार्कच्या स्वतःच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. म्हणून त्याचे भारतातच उत्पादन करण्यासाठी कंपनी स्वयंपूर्ण आहे. कंपनीच्या अमेरिकन आणि यू के च्या आरोग्य विभागाची मान्यता असलेल्या गुजरात मधील कारखान्यात एपीआय चे उत्पादन होते. अंतिम औषध निर्मिती अशीच मान्यता असलेल्या हिमाचल प्रदेशातील कारखान्यात होते. 

आलोक मलिक काय म्हणाले... 

ग्लेनमार्कच्या भारतातील व्यवसायाचे प्रमुख आणि कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आलोक मलिक याविषयी म्हणाले," फॅबिफ्ल्यू गोळ्या घेण्याचा सल्ला दिलेल्या मोठ्या रुग्णसंख्येने होणा-या या पाहणीतून आम्हाला या औषधाची परिणामकारकता आणि सुरक्षितता याचा अधिक चांगला अंदाज येईल. या साथीच्या सुरुवातीपासूनच आम्ही भारतात कोव्हिड -१९ च्या रुग्णांना सुलभतेने औषधोपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. आमच्या माहितीनुसार आम्ही भारतात उपलब्ध केलेले फॅबिफ्ल्यू फेव्हीपिरवर च्या तुलनेत (ज्या देशांत त्याला मान्यता आहे त्या देशात ) खूपच किफायती आहे. आता किंमत आणखी कमी झाल्याने भारतात ते अधिकच सुलभतेने मिळू शकेल. " 

अशा आहेत इतर देशात किंमती

संशोधन आणि विकास, चाचण्या आणि प्रत्यक्ष उत्पादन यावर मोठा खर्च करूनही ग्लेनमार्क ने फॅबिफ्ल्यू ची भारतातील किंमत इतर देशांच्या तुलनेत कमी ठेवली आहे. फॅबिफ्ल्यू ची भारतातील किंमत सुरुवातीला एका गोळीला १०३ रुपये होती. इतर देशात त्याची किंमत रु ६०० /प्रति गोळी (रशिया) , रु ३७८ प्रति गोळी (जपान ) रु ३५० /प्रति गोळी (बांगलादेश) आणि रु २१५ प्रति गोळी (चीन ) अशी आहे. 

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

तिस-या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण 

भारतीय औषध नियामक मंडळाने फॅबिफ्ल्यू ला मान्यता दिल्याचे ग्लेनमार्क ने २० जून ला जाहीर केले होते.याबरोबरच भारतात सौम्य ते मध्यम कोविड -१९ संसर्गावर उपचार म्हणून फेव्हिपिरवर वर आधारित तोंडावाटे घेण्याचे औषध म्हणून मान्यता मिळालेले पहिले औषध ठरले. या औषधाचे उत्पादन आणि प्रसिद्धी करण्याची परवानगी कोव्हिड -१९ च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या स्थितीत गतिमान मान्यता प्रक्रियेनुसार देण्यात आली. या मान्यतेच्या वापराचा मर्यादित स्वरूपात वापर करण्यासाठी ते घेणा-या रुग्णाची लेखी संमती घेतली जाते. भारतात मामुली सौम्य ते माध्यम संसर्ग झालेल्या रुग्णांना फॅबिफ्ल्यू चा फायदा होतो. ग्लेनमार्क ने फेविपिरवर (फॅबिफ्ल्यू ) च्या तीस-या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. या चाचण्यांचे निष्कर्ष लवकरच उपलब्ध होतील. 

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!