नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा व भगरीचे भाव वाढले!

अंबादास शिंदे
Tuesday, 6 October 2020

नवरात्रोत्सवात अनेक भाविक नऊ दिवसांचा उपवास करतात. या काळात साबूदाणा, भगर, शेंगदाणे या वस्तूंना मोठी मागणी असते. यंदा भगरीच्या भावाने उच्चांक गाठला आहे.

नाशिक रोड : नवरात्रोत्सवात अनेक भाविक नऊ दिवसांचा उपवास करतात. या काळात साबूदाणा, भगर, शेंगदाणे या वस्तूंना मोठी मागणी असते. यंदा भगरीच्या भावाने उच्चांक गाठला आहे.

भगर ११० रुपये किलो! 

नवरात्रोत्सव सुरू होण्यास दहा ते बारा दिवस असताना उपवासासाठी वापर होणाऱ्या भगरीचे भाव वाढले असून, किलोमागे तब्बल १०० ते ११० रुपये भाव झाला आहे. साबूदाण्याचे भावही ६५ ते ७० रुपये किलो आहे. साबूदाणा खिचडी व भगर या काळात खाल्ली जाते. मोहनलाल कंपनीचे संचालक नेमिचंद कोचर म्हणाले, की दर वर्षी उपवासाच्या पदार्थांना विशेष मागणी असते. यंदा भगर व इतर उपवासाच्या पदार्थांमध्ये भाववाढ झाल्याने साबूदाण्याला मोठी मागणी आहे. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prices of sabudana and bhagari increased due to Navratri festival nashik marathi news