कोरोनाशी झुंज अपयशी.. मुख्याध्यापकांच्या मृत्यूने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

कोरोना संसर्गानंतर मोठ्या प्रमाणावर सेवाव्रत असलेल्या मुख्याध्यापकाचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दहा दिवासापूर्वी त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या सहकार्याने वैतागवाडी झोपडपट्टीत किराणा साहित्य वाटप केले होते. ज्योतीनगरात बंदोबस्ताला असलेल्या पोलिस व जवानांना भोजन देण्यातून त्यांच्यासह परिवार बाधित झाला. आज (ता.१२) दुपारी जीवन रूग्णालयात उपचार सुरू असतांना, त्यांचा मृत्यु झाला. 

नाशिक / मालेगाव : कोरोनाशी झुंज देतांना येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विकास हिरामण मंडळ (वय 48) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. पश्चिम भागातील कोरोनाबाधित रूग्णाचा हा तिसरा मृत्यु असल्याने खळबळ उडाली आहे. 

पोलिस व जवानांना भोजन देण्यातून कोरोनाची बाधा
कोरोना संसर्गानंतर मोठ्या प्रमाणावर सेवाव्रत असलेल्या मुख्याध्यापकाचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दहा दिवासापूर्वी त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या सहकार्याने वैतागवाडी झोपडपट्टीत किराणा साहित्य वाटप केले होते. ज्योतीनगरात बंदोबस्ताला असलेल्या पोलिस व जवानांना भोजन देण्यातून त्यांच्यासह परिवार बाधित झाला. आज (ता.१२) दुपारी जीवन रूग्णालयात उपचार सुरू असतांना, त्यांचा मृत्यु झाला. 

हेही वाचा > मैलो न मैल अखंड प्रवास..अन् भररस्त्यात सुरू झाल्या प्रसूती वेदना..मग...

मोजक्या चौघांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
महाराष्ट्र खाजगी शाळा प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी, राष्ट्रसेवा दल, टीडीएफ या माध्यमातून ते प्रत्येक चळवळीत अग्रणी होते.त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्र सेवा दल, महात्मा ज्योतीबा फुले शिक्षण संस्था, नाशिक जिल्हा टीडीएफ, नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक, संघ, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यासह विविध सेवाभावी संस्थांनी त्यांना आदरांजली वाहिली. येथील श्रीरामनगर वैकुंठधामात मोजक्या चौघांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा >नियतीचा क्रूर डाव! कामधंदा नाही म्हणून कुटुंबासह निघाला गावी..पण कसारा घाटातच "त्याचा" काळ उभा होता..​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: principal death due to corona virus at malegaon nashik marathi news