फडणवीस सरकारची भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे बाहेर काढणार 

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 11 January 2020

भाजप आणि त्यांचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातून त्यांची विधाने पुढे येताहेत. मुळातच, सरकारला स्थिर होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, पहिल्याच दिवसापासून त्यांची कशी अवस्था झाली याचे दर्शन राज्यातील जनतेला घडत आहे, असे टीकास्त्र चव्हाण यांनी सोडले. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय घडले, हे राज्याने पाहिले आहे. त्यामुळे भाजपने कोणाशी मैत्री करावी हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असे  चव्हाण यांनी भाजपच्या मनसेसोबतच्या आघाडीच्या अनुषंगाने पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर दिले.

नाशिक : राज्यात सत्तांतरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये काय करावे लागत होते, अशी गाऱ्हाणे अधिकारी सांगू लागले आहेत. त्यामुळे राजरोसपणे केलेल्या भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे बाहेर काढण्यात येतील. त्यामध्ये समृद्धी महामार्गाचासुद्धा समावेश असेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले. गांधी शांतियात्रेनिमित्त झालेल्या सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

भाजपने कोणाशीही करावी आघाडी 

भाजप आणि त्यांचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातून त्यांची विधाने पुढे येताहेत. मुळातच, सरकारला स्थिर होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, पहिल्याच दिवसापासून त्यांची कशी अवस्था झाली याचे दर्शन राज्यातील जनतेला घडत आहे, असे टीकास्त्र चव्हाण यांनी सोडले. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय घडले, हे राज्याने पाहिले आहे. त्यामुळे भाजपने कोणाशी मैत्री करावी हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असे  चव्हाण यांनी भाजपच्या मनसेसोबतच्या आघाडीच्या अनुषंगाने पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर दिले. पुन्हा हाच प्रश्‍न पुढे आल्यावर  चव्हाण यांनी मनसे काय पण, एमआयएमशीसुद्धा आघाडी करावी, असे ते म्हणाले. 

फडणवीसांना रोखण्यासाठी आघाडी 
मी मुख्यमंत्री असताना 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. आम्ही तो प्रस्ताव मान्य केला नव्हता. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून वावरणारे देवेंद्र फडणवीस यांना विरोधक चालत नाही म्हटल्यावर राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंबंधी चांगले काम केलेल्या "सारथी' संस्थेला काम करू द्यायला हवे, असाही निर्वाळा त्यांनी दिला. 

या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवे

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबद्दल मोठी शंका आहे. न्यायालयीन, घटनात्मक पद्धतीने चौकशी करून या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाबद्दल निर्णय घ्यावा. 
-पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 

हेही वाचा >  "ओबीसींची जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस

तरुणांचा आवाज दडपण्याचे काम 
माजी आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले, की धर्माला जातीच्या नावाखाली वाटण्याचे काम सुरू आहे. त्यातून हिंसेचे वातावरण तयार होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकोप्याने राहावे, हा संदेश देण्यासाठी निघालेली ही यात्रा तीन हजार किलोमीटर प्रवास करणार आहे. देशात गंभीर प्रश्‍नांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच हा काळा कायदा करण्यात आला असल्याचा आरोप करून, त्याविरुद्ध विद्यापीठांतील तरुणांचा आवाज दडपण्याचे काम सरकारी गुंड करीत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. 

हेही वाचा >  धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithviraj chavhan statement on Devendra Fadnavis and BJP at Nashik Marathi News