सुप्रिया सुळेंना आयएमएचे साकडे...'खासगी डॉक्टर, कर्मचाऱ्यांना विमा लागू करा'

विनोद बेदरकर
Monday, 3 August 2020

महापालिकेशी संबंधित अडचणी मांडल्या. त्यात बायोमेडिकल वेस्टबाबत खासगी रुग्णालयातील अडचणीची सोडवणूक करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी खासदार सुळे यांच्याकडे केली. 

नाशिक : नाशिकमध्ये वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती घेतली. रविवारी (ता. २) दुपारी दीडच्या सुमारास व्हिडिओ कॉन्‍फरन्सिंगद्वारे महापालिका आयुक्त आणि नाशिकमधील आयएमए, असोसिएशन ऑफ फिजिशियनच्या सदस्यांशी संवाद साधून उपाययोजनांची माहिती घेतली. 

खासगी रुग्णालयातील अडचणीची सोडवणूक करावी

डॉ. समीर चंद्रात्रे म्हणाले, की 'आयएमए'च्या ३० सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोज चार डॉक्टर जिल्हा रुग्णालयात नॉन कोविडसाठी सेवा देत आहेत. महापालिकेकडे रुग्णालय नोंदणीचे विषय प्रलंबित आहेत. डॉक्टर प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीला धावून जात असताना सरकारी डॉक्टरांसोबत कोरोना रोखण्यासाठी काम करणाऱ्या खासगी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विमा लागू करावा. तसेच महापालिकेशी संबंधित अडचणी मांडल्या. त्यात बायोमेडिकल वेस्टबाबत खासगी रुग्णालयातील अडचणीची सोडवणूक करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी खासदार सुळे यांच्याकडे केली. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे, असोसिएशन ऑफ फिजिशियनचे अध्यक्ष डॉ. विनोद व्हिजन, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. प्रशांत सोनवणे, सतीश पवार आदींसह विविध डॉक्टर सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त गमे यांनी महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णसंख्या व महापालिकेच्या उपाययोजनांची माहिती दिली. 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. चंद्रात्रे यांनी कामांची माहिती देताना आयएमए डॉक्टरांच्या अडचणी मांडल्या. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private doctors, apply insurance to employees, IMA demands from MP Supriya Sule nashik marathi news