...नाहीतर खाजगी रुग्णालयांवर होणार ‘एफआयआर’! शरद पवार यांच्या सूचनेनंतर अंमलबजावणी

hospital reception.jpg
hospital reception.jpg

नाशिक : खासगी रुग्णालयांकडून कोरोनारुग्णांवर अव्वाच्या सव्वा बिले लावल्या जात असल्याच्या तक्रारींची दखल राज्य शासनाने घेतल्यानंतर महापालिका हद्दीतील ३२ मोठ्या रुग्णालयांमध्ये बिलांचे ऑडिट करण्यासाठी लेखापरीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. शासन नियमाप्रमाणे बिल लावण्यास नकार दिल्यास रुग्णालयांवर पोलिसांत एफआयआर नोंदविण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी लेखापरीक्षकांना दिल्या. 

खासदार पवार यांच्या सूचनेनंतर अंमलबजावणी
खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनारुग्णांवर उपचार करताना अव्वाच्या सव्वा बिले लावले जात असल्याच्या तक्रारी शहरात प्राप्त झाल्या होत्या. याविरोधात शिवेसनेने थेट हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला होता. महापालिकेने त्याचवेळी लेखापरीक्षक नियुक्त करण्याची घोषणा केली होती. शुक्रवारी (ता.२४) राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही रुग्णांची लूट होऊ नये, यासंदर्भात सूचना केल्या होत्या. शनिवारी (ता.२५) तातडीने अंमलबजावणी करताना ३२ रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. 

खासगी रुग्णालयांत करणार लेखापरीक्षकांची नियुक्ती ​
रुग्णालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे, एकूण बेड संख्येच्या ८० टक्के बेडवर दर लावलेले असावेत, रुग्णांना देयके देण्यापूर्वी लेखापरीक्षकांमार्फत पूर्वतपासणी करणे बंधनकारक, शासन निर्देशाप्रमाणे बिले लावली आहेत की नाही, याची तपासणी करणे, रुग्णालयाने शासन निर्देशाप्रमाणे बिल आकारण्यास नकार दिल्यास पोलिसांत फिर्याद नोंदविणे, दर दिवशी किती कोविड व नॉनकोविड रुग्णांची देयके प्रमाणित केली, याचा अहवाल मुख्य लेखापरीक्षकांना सादर करणे, लेखापरीक्षकांना रुग्णालय महात्मा फुले जनआरोग्य जीवनदायी योजनेत नोंदणीकृत आहे किंवा कसे याची माहिती घेऊन नसल्यास योजनेत समावेश करावा, एखाद्या रुग्णालयाने अंमलबजावणी केली नसेल, तर मुख्य लेखापरीक्षकांना अहवाल सादर करावा, लेखापरीक्षणाचे कामकाज झाल्याशिवाय रुग्णालय सोडू नये, लेखापरीक्षकांनी रुग्णालयात असेपर्यंत भ्रमणध्वनी बंद करू नये, लेखापरीक्षकांनी पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहू नये, चॅरिटेबल ट्रस्ट कायद्याखाली नोंदणीकृत खासगी रुग्णालयामध्ये ८० टक्के बेडवर कोविड व नॉनकोविडचे दर लागू राहतील व दहा टक्के बेडचे उपचार मोफत केल्याची खात्री लेखापरीक्षकांनी करावी, अशा सूचना आयुक्त गमे यांनी दिल्या. 

लेखापरीक्षकांची जबाबदारी निश्‍चित (कंसात रुग्णालयाची नावे) 
- एम. सी. केंदळे (वोक्हार्ट), निशांत सावंत (सह्याद्री), एच. आय. शेख (लाइफ केअर), झेड. वाय. शेख (वक्रतुंड), एस. पी. अनावट (सुशीला), के. बी. धारणकर (साईखेडकर), एस. एन. ताठे (पायोनिअर), के. बी. ठाकरे (रेडियंट), के. आर. पडोळ (सुदर्शन), डी. पी. इंगळे (शताब्दी), एस. आर. पवार (श्री पंचवटी), आर. सी. गवळी (न्यू परिक्षित), एस. पी. खोडे (लोकमान्य), आर. एस. घुले (पॅनासिया जॉइंट), बी. एन. गायकवाड (ॲपेक्स वेलनेस), डी. टी. तमखाने (सिक्स सिग्मा), के. के. जाधव (श्री गुरुजी), एम. व्ही. गांगुर्डे (सूर्या), आर. आर. दिमाठे (आयुष), पी. टी. टोचे (सिद्धिविनायक), प्रतिभा मोरे (अपोलो), एस. आर. खाडे (अशोका), सी. एस. भुजबळ (वेलकेअर), आर. जे. शिंदे (राजेबहाद्दूर), डी. एन. कांबळे (मॅग्नम), उदावंत (गांगुर्डे हॉस्पिटल), एस. पी. पिंगळे (मोतीवाला महाविद्यालय), एस. एन. गवळी (दिव्यज्योत), आर. बी. सोनवणे (ज्युपिटर), एस. आर. बागूल (एचसीजी मानवता), पी. के. बागूल (श्री साईबाबा), आर. आर. दुल्ला (रामालयम). 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com