फटाके उद्योगाला कोरोनाची झळ; उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटले

युनूस शेख
Tuesday, 22 September 2020

दिवाळीत फटाक्यांचे मोठे आकर्षण असते. सणाच्या तीन ते चार महिन्यांआधीपासूनच विविध प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादनाची लगबग सुरू होते. मागणी जास्त असल्याने कंपन्यांमध्ये रात्रीचा दिवस केला जातो. विक्रेते आणि उत्पादकांना लाखोंचे उत्पन्न मिळते. यंदा मात्र त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

जुने नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लावलेल्या लॉकडाउनमुळे यंदा लग्नसराईत फटाके विक्री झाली नाही. किरकोळ आणि होलसेल विक्रेत्यांकडील माल पडून आहे. पुढे कोरोनाची परिस्थिती कशी असेल याची शाश्वती नसल्याने दिवाळीवरही त्याचे सावट आहे. दिवाळी दीड ते दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना, हवी तशी मागणी नसल्याने या वर्षीच्या उत्पादनात सुमारे ५० टक्के घट झाल्याचा दावा उत्पादकांनी केला आहे. 

विक्रेत्यांकडे माल पडून

दिवाळीत फटाक्यांचे मोठे आकर्षण असते. सणाच्या तीन ते चार महिन्यांआधीपासूनच विविध प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादनाची लगबग सुरू होते. मागणी जास्त असल्याने कंपन्यांमध्ये रात्रीचा दिवस केला जातो. विक्रेते आणि उत्पादकांना लाखोंचे उत्पन्न मिळते. यंदा मात्र त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लावलेल्या लॉकडाउनचा फटाके व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. लॉकडाउनमध्ये बाजारपेठच बंद होते असे नाही, तर धार्मिक कार्यक्रम, लग्नसोहळे, विविध प्रकारचे सण-उत्सव साजरे करण्यावरदेखील प्रतिबंध होते. लॉकडाउनमध्ये लग्नसोहळेदेखील मर्यादित झाल्याने फटाक्यांना मागणी नव्हती. त्यामुळे शहरातील विविध विक्रेत्यांकडे माल पडून असल्याने सुमारे १६ ते १७ लाखांचे नुकसान झाले आहे. आता हवी तशी मागणी नाही. त्यामुळे नवीन मालाच्या मागणीत ५० टक्के घट झाली आहे. 

हेही वाचा > आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे फटाके खरेदी-विक्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोना संकटातून लवकरच सुटका व्हावी, पुन्हा सर्व व्यवहार सुरळीत होतील, अशी आशा आहे. 
-गोविंद शिरोळे, फटाके उत्पादक 

हेही वाचा > अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production in the fireworks industry fell by fifty per cent nashik marathi news