अखेर करआकारणीच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सादर; सत्ताधारी, विरोधी नगरसेवकांची कसोटी

 proposal for tax collection privatization was submitted to Nashik Municipal Corporation nashik marathi news
proposal for tax collection privatization was submitted to Nashik Municipal Corporation nashik marathi news
Updated on

नाशिक : घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेकडे अपुरे कर्मचारी असल्याने व सद्यःस्थितीत मालमत्ता व नळधारकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ६६७ कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. यामुळे अखेर महापालिका प्रशासनाने खासगीकरणावर मोहोर उमटविली असून, महासभेवर तसा प्रस्ताव सादर केला आहे. प्रशासनाच्या हातून आता बाण सुटल्याने सत्ताधारी भाजपची कसोटी लागणार आहे, तर विरोधी नगरसेवकही काय भूमिका घेतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 

निर्णयाकडे नाशिककरांचे लक्ष 

महापालिकेचा प्रमुख उत्पन्नस्रोत असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खासगीकरण झाल्यानंतर अनेक प्रश्‍न निर्माण होणार आहेत. ज्या मक्तेदाराला वसुलीचे काम दिले जाईल, तो नागरिकांच्या दारात जाऊन वसुली करण्यापासून ते शहरात गुंडगिरी वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींकडून उपस्थित होत असलेल्या प्रश्‍नांना न जुमानता प्रशासनाने खासगीकरणाचा प्रस्ताव सादर केल्याने वादात भर पडणार आहे. भाजपमध्ये आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेवकांनी विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. तसे झाल्यास नागरिकांचा रोष भाजपला सहन करावा लागण्याची शक्यता आहे. 
 

महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा उद्दिष्ट पूर्ण होत नाही. घरपट्टी थकबाकीची ५०, तर या वर्षाच्या मागणीच्या ९० टक्के तसेच पाणीपट्टी वसुलीची ९० टक्के रक्कम पाणीपुरवठा योजनांवर खर्च करणे बंधनकारक केले आहे. शहरात चार लाख, ४६ हजार ८३३ मालमत्ताधारक, तर एक लाख ९८ हजार ६३४ नळकनेक्शनधारक आहेत. दर वर्षी यात १५ ते २० टक्के वाढ होत आहे. मात्र, पालिकेकडे सध्या वसुलीसाठी ११५ कर्मचारी असून, सद्यःस्थितीत वसुलीसाठी ६६७ कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. मात्र, महापालिकेकडे तेवढे मनुष्यबळ नाही. मालमत्ताकराची २४८ कोटी रुपये रक्कम थकीत आहे, तर या आर्थिक वर्षाच्या मागणीपैकी ७० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. पाणीपट्टीची ८० कोटी रुपयांची थकबाकी असून, या वर्षाची मागणी ४२ कोटी रुपये आहे. आतापर्यंत सध्याची मागणी व थकीत रकमेच्या १९.३० कोटी रुपये वसूल झाले आहेत. सवलत देऊनही अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे कारणे पुढे करून प्रशासनाने प्रस्ताव सादर केला आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com