
२३४ किलोमीटरचा हा मार्ग असून, १४० किलोमीटर प्रतितास या वेगाने २४ रेल्वेस्थानके मिळून हा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या कनेक्टिव्हिटीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून, उद्योग-व्यवसाय रोजगार शिक्षण आणि दळणवळण याला हातभार लागणार आहे.
नाशिक रोड : पुणे-नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. २३४ किलोमीटरचा हा मार्ग असून, १४० किलोमीटर प्रतितास या वेगाने २४ रेल्वेस्थानके मिळून हा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या कनेक्टिव्हिटीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून, उद्योग-व्यवसाय रोजगार शिक्षण आणि दळणवळण याला हातभार लागणार आहे.
प्रतितास १४० किलोमीटर वेग
महा रेल ही रेल्वे विभाग व राज्य शासनाची एकत्र काम करणारी कंपनी आहे. ही कंपनी या प्रकल्पाची उभारणी जलदगतीने करणार आहे. पुणे, हडपसर, मांजरी, कोळवडी, वाघोली, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, साकूर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, शिंदे आणि नाशिक रोड यांसारखी महत्त्वाची स्थानके या रेल्वेमार्गात येणार आहेत. या रेल्वे प्रकल्पाचा खर्च १६ हजार कोटींचा आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंत्रिमंडळात लवकर आणून संमत करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे एका बैठकीत ठाकरे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार यांनी चर्चेत भाग घेतला.
हेही वाचा > देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस
कनेक्टिव्हिटीला चालना
पुण्याला जाण्यासाठी सध्या सहा तास खर्च होतात. त्यात वाहतुकीचा अडथळा, खड्डे, रस्त्यांच्या अडचणींबरोबरच वेळखाऊ प्रवास होत असतो. त्यामुळे ही रेल्वे सुरू झाल्यावर कनेक्टिव्हिटीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून किमान दोन तासांत रेल्वेने पुणे गाठणे शक्य होणार आहे. नाशिकचे अनेक उद्योजक, विद्यार्थी, नोकरदार पुण्याशी निगडित असल्यामुळे नाशिक-पुणे कनेक्टिव्हिटी सोयीची असणार आहे.
हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?