अल्पवयीन मुलाला रोज "अशी" कामे सांगून करायचे शोषण ...एके दिवशी...

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 25 February 2020

पथकाने पंचांसमक्ष सोमवारी (ता. 24) दुपारी गॅरेजवर छापा टाकला. त्या वेळी येथे वास्तव्यास असलेला व किशनगंज (बिहार) येथील 12 वर्षीय बालक वाहनाला ऑयलिंग करणे, तसेच गॅरेजची कामे करताना आढळले. चौकशीत गॅरेजमालक कोणताही मोबदला देत नसल्याचे पुढे आले. यातून बालकामगाराचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण होत असल्याचे निदर्शनास आले.

नाशिक : नाशिक रोड परिसरात असलेल्या गॅरेजमध्ये विनावेतन काम करणाऱ्या 12 वर्षीय परप्रांतीय बालकाची सुटका करण्यात आली. कामगार उपायुक्त कार्यालयाने केलेल्या या कारवाईप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत गॅरेजमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

असे व्हायचे शोषण..

दुकाने निरीक्षक ललित दाभाडे, विलास झांबरे, चाइल्डलाइन टीमच्या स्वाती शेळके, प्राजक्ता शोभावत, कामगार कल्याणचे लिपिक संजय शिंदे, पोलिस नाईक शहाजी भोर, शिपाई गणेश कोठुळे यांच्या पथकाने पंचांसमक्ष सोमवारी (ता. 24) दुपारी गॅरेजवर छापा टाकला. त्या वेळी येथे वास्तव्यास असलेला व किशनगंज (बिहार) येथील 12 वर्षीय बालक वाहनाला ऑयलिंग करणे, तसेच गॅरेजची कामे करताना आढळले. चौकशीत गॅरेजमालक कोणताही मोबदला देत नसल्याचे पुढे आले. यातून बालकामगाराचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दुकान निरीक्षक ललित दाभाडे यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित बालकामगाराची सुटका करून त्यास, उंटवाडी येथील बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले.  

हेही वाचा > हृदयद्रावक! रक्ताच्या थारोळ्यात असूनही "माऊलीची" बाळाची घट्ट मिठी सुटली नव्हती...अखेर..

परप्रांतीय बालकामगाराची सुटका 

सतीश बागूल (रा. कदमचाळ, गोसावीवाडी, नाशिक रोड) असे संशयित गॅरेजमालकाचे नाव आहे. संशयित बागूल याचे श्रमिक हॉलजवळील शाहू पथ येथे सतीश ऍटोक्राफ्ट नावाचे गॅरेज आहे. या ठिकाणी अल्पवयीन बालकाकडून विनावेतन काम करून घेतले जात असल्याची माहिती नवजीवन वर्ल्डपीस ऍन्ड रिसर्च फाउंडेशनला मिळाली होती. याबाबत फाउंडेशनने कामगार उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल करीत, पीडित बालकामगाराची सुटका करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, कामगार उपायुक्त कार्यालयाने पोलिसांच्या मदतीने गॅरेजवर छापा टाकून कारवाई केली.

हेही वाचा > धक्कादायक! खेळणाऱ्या चिमुकलीचा आवाज अचानक शांत झाला..आईने पाहिले तेव्हा तिचे पाय टबमध्ये होते...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provincial child labor relief at Nashik Marathi News