मालेगावला मरकजहून परतलेले 14 पैकी 7 जण क्वारंटाइन...!

corona.jpg
corona.jpg
Updated on

नाशिक : (मालेगाव) दिल्ली निजामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या मरकजच्या कार्यक्रमाला हजेरी लावून शहरात परतलेल्या 14 पैकी 7 जणांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. महापालिकेच्या मदनीनगर कक्षात नऊ क्वारंटाइन असलेल्यांवर उपचार सुरु आहेत. ही माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली. 

वैद्यकीय देखरेख व नियमित तपासणी सुरु

राज्य शासनाने महापालिका प्रशासनाला 14 जणांची यादी पाठविली होती. यातील सात जणांचा शोध घेण्यात आला आहे. सात नागरिक अद्यापही बाहेरच आहेत. एका नावाबद्दल संदिग्धता आहे. आज नव्याने फक्त एक जण दाखल झाला. दोघांवर उपचार सुरु आहेत. सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत वीस जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. 18 जणांचा अहवाला निगेटिव्ह आला असून दोन अहवाल प्रलंबित आहेत. सामान्य रुग्णालयात दोन व मदनीनगर येथे नऊ अशा एकूण 11 जणांवर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असलेल्या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. किशोर डांगे, डॉ. भिमराव त्रिभुवन यांनी सांगितले. शहरात विदेशातून परतलेल्यांची संख्या 118 झाली आहे. यातील 56 जणांचे होम क्वारंटाइन पुर्ण झाले आहेत. साठ नागरिकांची वैद्यकीय देखरेख व नियमित तपासणी सुरु आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात असलेले दोघेजणही निरीक्षणाखाली आहेत. 

जीवन हॉस्पीटलचा मार्ग मोकळा

महापालिका प्रशासनाने कोरोना विषाणु नियंत्रणासाठी शहरातील खासगी जीवन हॉस्पीटल अधिग्रहीत केले आहे. या हॉस्पीटलमध्ये 60 खाटांची सोय आहे. मात्र कोरोनासाठी रुग्णालय देण्याबाबत संबंधित संचालकांच्या मनात संशय होता. आयुक्त श्री. बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीची बैठक पार पडल्यानंतर हॉस्पीटल ताब्यात घेण्या संदर्भातील मार्ग मोकळा झाला आहे. श्री. बोर्डे, श्री.कापडणीस यांच्यासह सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे, डॉ. रितेश महाले, डॉ. भिमराव त्रिभुवन, डॉ. सुमित शहा, डॉ. विलास चोरडीया, डॉ. पियुष रणभोर, डॉ. प्रशांत ठोके, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे आदींनी या रुग्णालयाची पहाणी केली. त्यात गरजेनुसार आवश्‍यक असलेल्या वैद्यकीय वस्तू अधिग्रहीत करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Trimbakeshwar Bhujang Tirtha Location Identified Near Brahmagiri Historians Reveal an Important Link to Ancient Traditions
Lasalgaon Nagar Parishad
Rajapur Mamdapur forest tourism Maharashtra
Aadhaar PAN Voter ID Found in Garbage
Marathi News Esakal
www.esakal.com