घरबसल्या कोरोनावर फॉरवर्ड केलेला मेसेज 'असा' अंगाशी आला...! की थेट रवानगी जेलमध्येच

whatsapp.jpg
whatsapp.jpg

नाशिक : (मालेगाव) शहरातील जय श्रीराम युवा मंच या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर कोरोना संदर्भात दोन समाजात तेढ निर्माण करणारा मजकुर टाकल्याने आक्षेपार्ह मजकूर टाकणारा व ग्रुप ॲडमीन अशा दोघांना कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. दोघा संशयितांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

असा आहे प्रकार

गोपाळ सोनवणे (30, रा. इंदिरानगर, सोयगाव) हा जय श्रीराम युवा मंच या व्हॉट्‌सॲप ग्रुपचा ॲडमीन आहे. या ग्रुपवर मोतीलाल शेवाळे (42, रा. कलेक्टर पट्टा) यांनी कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकला. कॅम्प पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आला. हवालदार मनोज डिंगर यांच्या तक्रारीवरून दोघांविरुध्द कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली. न्यायालयात उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उपनिरीक्षक एस. एच. देशमुख तपास करीत आहेत. सोशल मिडीयावर अपप्रचार, कोरोनासंदर्भात अफवा व सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर टाकणाऱ्यांविरुध्द पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. यापुर्वी आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल सिध्दार्थ पटाईत तसेच पोहोणे येथे कोरोनाबाधीत व्यक्ती आढळल्याची अफवा पसरविण्याच्या आरोपावरुन अजंगचे उपसरपंच सिध्दार्थ गरुड यांना अटक करण्यात आली होती. टिकटॉकवर कोरोनासंदर्भात अपप्रचार करणारा व चीड आणणाऱ्या मजकुराची ध्वनी चित्रफीत टाकल्याच्या आरोपावरुन अब्दुल रहिम कुरेशी, सय्यद हुसेन अली, सुफियान शेख मुक्तार व सैय्यद जमील बाबू या चौघांना अटक करण्यात आली होती.

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याच्या आरोपावरुन वेगवेगळ्या पाच गुन्ह्यात आजवर अटक झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. तरी देखील अफवांचे पेव सुरुच आहे. सायबर क्राईम पोलिस सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून असून अफवा पसरविणारे व आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, उपअधिक्षक रत्नाकर नवले व ग्रामीणचे उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com