''राजे सर्व जनतेचे, ते कुणा एकाचे नाही, मग तलवारी कुणावर काढणार?'' - भुजबळ

विनोद बेदरकर
Sunday, 11 October 2020

‘राजे सर्व जनतेचे असतात. ते कुणा एकाचे नसतात. तलवारी कुणावर काढणार? त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकला पाणी नियोजन आणि कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

नाशिक : ‘राजे सर्व जनतेचे असतात. ते कुणा एकाचे नसतात. तलवारी कुणावर काढणार? त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकला पाणी नियोजन आणि कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

राज्याचे वातावरण टिकविण्याचे प्रयत्‍न गरजेचे 

श्री. भुजबळ म्हणाले, कुठलाही एक निर्णय घेताना त्याचा इतर समाजावर काय परिणाम होणार, याचा विचार करायला हवा. त्यामुळे उगाचच वातावरण पेटते ठेवणारे बोलणे टाळले पाहिजे. तलवारी नाही, पण शब्दांची खणखणी झाली आहे, ती थांबायला पाहिजे. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने आरक्षण झालेच पाहिजे, असे काहींचे प्रयत्न आहे, तर काहींचे मात्र राजकारण सुरू आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे. त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घेत सर्वांनीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा-ओबीसी भांडणं लावणं आता थांबवायला पाहिजे. त्यावर बरीच चर्चा झालीय, खासदार संभाजीराजे यांच्या वक्तव्यांविषयी ते म्हणाले, की राजे सर्व जनतेचे असतात. त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे, असे वडेट्टीवार बोलले होते. वडेट्टीवार हे त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे ते बोलणारच असे स्पष्ट केले. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

बार नऊपर्यंतच 

नाशिक शहरात बार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असली तरी सकाळी ११ ते रात्री नऊपर्यंतच बार सुरू राहतील. पण इतर दुकानं आणि हॉटेल मात्र सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सुरू राहतील. बारला सकाळी आठला परवानगी नसेल.  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raje, on whom will the sword be drawn - Bhujbal nashik marathi news