
मिळालेल्या माहितीनुसार, शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
नाशिक : इगतपुरी तालुक्यात आज मंगळवारी (ता. 1) संध्याकाळच्या सुमारास पर्यटनाकरीता आलेले नाशिकचे रणजी क्रिकेटपटु शेखर गवळी हे मोबाइलद्वारे सेल्फी घेत असताना अचानकपणे पाय घसरून 250 फुट खोल दरीत पडले असून शोध कार्य सुरू आहे. अंधारामुळे मोहीम थांबवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी ते सेल्फी घेत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट २५० फूट दरीत कोसळले. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. तसेच इतर स्थानिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्यांचा काहीही शोध लागू शकला नाही.
हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता
उद्या घेतला जाणार शोध
दरम्यान त्यांचा शोध घेण्यासाठी नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी उद्या (2 सप्टेंबर) रवाना होणार आहे. त्यावेळी पुन्हा त्यांचा शोध घेतला जाईल. शेखर गवळी हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहे. त्यामुळे या दुर्घटनेने क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना धक्का बसला आहे.
हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ
राज्यात विसर्जनादरम्यान १० जणांचा बुडून मृत्यू
राज्यात गणेश विसर्जनादरम्यान आतापर्यंत १० जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात नाशिकमध्ये सहा जणांना, जळगावात तिघांना तर पुण्यात एकाला विसर्जनावेळी आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक तालुक्यात चौघांचा तर देवळा आणि निफाड तालुक्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समजते.
संपादन - रोहित कणसे