कोरोनाबाधित अन्‌ मृत्युदरापेक्षा निगेटिव्हचे प्रमाणच दहापट जास्त...वाचा सविस्तर.. 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. मात्र, राज्यात कोरोना संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही अधिकच राहिले आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचीच संख्या अधोरेखित होत असताना निगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्या रुग्णांचा मोठा आकडा दिलासा देणारा आहे.

नाशिक : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. मात्र, राज्यात कोरोना संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही अधिकच राहिले आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचीच संख्या अधोरेखित होत असताना निगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्या रुग्णांचा मोठा आकडा दिलासा देणारा आहे.

त्याच वेळी कोरोनाबाधित आणि निगेटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या

कोरोना विषाणूच्या संकटात उत्तर महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यूच्या तुलनेत निगेटिव्ह रिपोर्टचे प्रमाण थेट दहापटींपेक्षा जास्त आहे. उत्तर महाराष्ट्रातील 21 हजार 583 संशयित रुग्णांचे म्हणजेच एकूण रुग्णांच्या 82.91 टक्के रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. यात नंदुरबार जिल्हा आघाडीवर असून, येथील बाधित रुग्णांचे प्रमाणही सर्वात कमी 2.70 टक्के आहे. धुळे जिल्ह्यात मात्र कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक 12.34 टक्के आहे. त्याच वेळी कोरोनाबाधित आणि निगेटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. 

26 हजार 30 कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले
उत्तर महाराष्ट्रात कोरोना विषाणूची बाधा नगर जिल्ह्यातून सुरू झाली. त्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारपर्यंत कोरोनाने पाय पसरले. गेल्या अडीच महिन्यांच्या या काळात उत्तर महाराष्ट्रात 26 हजार 30 कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. यातील दोन हजार 340 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, तर आतापर्यंत 198 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 21 हजार 583 संशयित रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. सर्वाधिक स्वॅब घेतलेल्या नाशिकमध्ये दहा हजार 635 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह, 73 रुग्णांचा मृत्यू, तर एक हजार 255 बाधित रुग्ण आहेत. 
उत्तर महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक 94 मृत्यू जळगाव जिल्ह्यात झाले असले, तरी मृत्यूचे प्रमाण मात्र धुळे जिल्ह्यात जास्त आहे. सर्वांत कमी तीन मृत्यू नंदुरबार जिल्ह्यात, तर प्रमाण नाशिक जिल्ह्यात सर्वांत कमी आहे, तसेच सर्वाधिक एक हजार 255 बाधित रुग्ण नाशिकमध्ये असून, जळगाव जिल्ह्यात बाधितचे प्रमाण सर्वाधिक व नंदुरबार जिल्ह्यात सर्वांत कमी 36 रुग्ण बाधित आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता

उत्तर महाराष्ट्रातील स्थिती (प्रमाण टक्केवारीत) : 
जिल्हा निगेटिव्ह कोरोनाबाधित मृत्यू 

नाशिक 84.99 10.03 5.81 
नगर 91.10 5.03 6.45 
धुळे 78.33 6.10 12.34 
जळगाव 75.99 10.79 12.31 
नंदुरबार 94.07 2.70 8.33 
एकूण 82.91 8.98 8.46 
(31 मे 2020 अखेरपर्यंतची आकडेवारी)  

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rate of negativity is ten times higher than the rate of coronary heart disease nashik marathi news