धक्कादायक! नरभक्षक बिबटयाच्या हल्ल्यात महिला ठार; गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

The re-emergence of the man-eating leopard nashik marathi news
The re-emergence of the man-eating leopard nashik marathi news

 नाशिक/इगतपुरी: शहरापासुन अवघ्या ७ कि.मी. अंतरावर चिंचलेखैरे ही वस्ती आहे. तेथे राहणाऱ्या भोराबाई काल रात्री ( ता ७) रात्री जेवणानंतर मुलगी, जावई व मुलं हे घरात झोपले होते तर घराच्या पडवित भोराबाई झोपल्या होत्या. पहाटेच्या सुमारास केव्हातरी बिबटयाने झोपेतील भोराबाई यांना ओढून नेले व दूर साधारण एक किलोमीटर फरपटत नेल्यानंतर त्यांच्या मान ,छातीचा भाग खाल्याचे मृतदेह जंगलातच टाकून दिल्याचे सकाळी उघडकीस आले. सकाळी घरातील मानण उठल्यावर बाहेर भोराबाई अंथरूनात दिसल्या नाही म्हणुन आजुबाजुच्या परिसरात शोधले तेव्हा साधारण एक किलोमीटर अंतरावर एका झुडपात रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह दिसल्याने तात्काळ पोलीसांना खबर दिली व पोलीस व वनविभागाने महिलेचा पंचनामा करीत ग्रामिण रूग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारींनी महिलेला मयत घोषीत केले. 

इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात मृत महिलेच्या शव विच्छादनाची सोय नसल्याने मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.या घटनेने परिसरात भितीचे वातावरण असून नरभक्षक बिबटयाला पकडण्यासाठी वनविभाग या भागात सापळा रचुन पिंजरा व कॅमेरे लावण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थानी केली आहे.तसेच या घटनेनंतर भागातील व गावकऱ्यांना हि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश डोमसे, वनपाल अधिकारी पोपटराव डांगे, वनरक्षक के. के. हिरे, एम . बी .धादवड, वाहनचालक मुजाफर शेख, काळु आगीवले, पोलीस कर्मचारी संदिप शिंदे, शिवाजी लोहरे, यशवंत कामडी, चिंचलेखैरे सरपंच मंगा खडके, उपसरपंच नथु पारधी, पोलीस पाटील संजय भगत, विजय भुरबुडे आदीनी पाहणी केली . 

दुसरा हल्ला 
मध्यरात्री झोपलेल्या ज्येष्ठावर हल्ला करुन जंगलात नेउन फस्त करण्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी दारणे काठच्या दोनवाडे भागात १५ जूनला बिबट्याने मळ्यात झोपलेल्या जीवराम ठुबे (वय ७५) या ज्येष्ठांवर हल्ला करीत ठार करीत, जंगलात फरफरट नेले होते.

संपादन - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com