बेशिस्तीला बसणार चाप! 'नो पार्किंग' झोनमध्ये एका दिवसात साडेचार हजार दंडाची वसुली

प्रमोद सावंत
Saturday, 26 September 2020

पंचक्रोशीतील नागरिक आपल्या दुचाकी अस्ताव्यस्त उभ्या करतात. यातून शिस्तीचे पालन करणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप व रहदारीची कोंडी होते. यामुळे प्रत्येकी दोनशे रुपये दंड भरल्यानंतरच जॅमर काढले. शहरवासीयांनी या मोहिमेचे स्वागत केले. 

नाशिक : (मालेगाव) शहरातील प्रमुख रस्ते, चौक व वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्तरीत्या दुचाकी उभ्या करून वाहतुकीस अडथळा, वाहतूक कोंडी व अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या दुचाकी चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने शुक्रवार (ता. २५)पासून जॅमर लावून दंडात्मक कारवाई करत जोरदार मोहीम सुरू केली आहे. 

शहरवासीयांकडून मोहिमेचे स्वागत

वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बशीर शेख व सहकाऱ्यांनी शुक्रवारी पहिल्याच दिवशी २२ वाहनांना जॅमर लावत चार हजार ४०० रुपये दंडाची वसुली केली. शहरातील सर्व प्रमुख रस्ते, वर्दळीचे ठिकाण, बँक व परिसरात पंचक्रोशीतील नागरिक आपल्या दुचाकी अस्ताव्यस्त उभ्या करतात. यातून शिस्तीचे पालन करणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप व रहदारीची कोंडी होते. यामुळे प्रत्येकी दोनशे रुपये दंड भरल्यानंतरच जॅमर काढले. शहरवासीयांनी या मोहिमेचे स्वागत केले. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

अनेक व्यापारी संकुलधारकांना तंबी

मोहीम सुरू करण्यापूर्वी पोलिसांनी विविध भागांत बैठका घेऊन अस्ताव्यस्त पार्किंग व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी अनेक व्यापारी संकुलधारकांना तंबी दिली. यानंतर काही संकुलधारकांनी सुरक्षारक्षक नेमले. अनेक दुकानदारांनीही बेशिस्त पार्किंग रोखण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. आगामी काळात ही कारवाई कठोरपणे होईल, असे श्री. शेख यांनी सांगितले.  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovery of four and a half thousand fines in malegaon nashik marathi news