'पीएसआय' परीक्षेबाबत मॅटमध्ये याचिका दाखल; सुनावणीकडे उमेदवारांचे लक्ष

अरुण मलाणी
Wednesday, 14 October 2020

मुख्य परीक्षेच्‍या निकालात सुमारे दोनशे उमेदवार एसईबीसी प्रवर्गातून मुलाखतीसाठी पात्र ठरले असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला आहे. आता या प्रक्रियेमुळे हे उमेदवार भरडले जातील, अशी भितीदेखील व्‍यक्‍त केली जाते आहे. 

नाशिक : पोलिस उपनिरीक्षक परीक्षा २०१९ च्‍या वेळी मराठा आरक्षण लागू होते. परंतु सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या मराठा आरक्षणाला दिलेल्‍या स्‍थगितीचा संदर्भ घेत, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) तील काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासन प्राधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतली आहे. परीक्षा प्रक्रियेत मुलाखतीचा टप्पा आगामी काळात राबविला जाणार असतांनाच दाखल याचिकेमुळे ही प्रक्रिया पुन्‍हा बारगळण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. 

याचिकेच्‍या सुनावणीकडे उमेदवारांचे लक्ष 

पोलिस उपनिरीक्षक परीक्षा २०१९ या मुख्य परीक्षेचा निकाल मार्च २०२० मध्ये जाहीर झाला होता. त्‍यावेळी एसईबीसी आरक्षण लागू होते. या निकालात ओबीसीची मेरीट ११५ गुणांची होती. तर एसईसीबीची १२१, खुल्‍या प्रवर्गाची १२५ गुणांची होती. परंतु सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या निकालानंतर आता ओबीसी प्रवर्गातील काही उमेदवार सुधारीत निकाल लावण्यासाठी प्रयत्‍न करीत आहेत. यातून एक, दोन गुणांनी मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्‍या उमेदवारांना मुलाखतीची संधी मिळण्यासाठी हे प्रयत्‍न केले जात आहेत. याचिकेच्‍या सुनावणीकडे आता उमेदवारांचे लक्ष लागून आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

वाद निर्माण होण्याची शक्‍यता 

साधारणतः दोन आठवड्यांपूर्वी आयोगातर्फे जारी सूचनांनुसार मुख्य परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांनी मुलाखत व मैदानी चाचणीसाठी तयार राहाण्याच्‍या सूचना दिलेल्‍या होत्या. तर या प्रक्रियेसंदर्भातील पुढील वेळापत्रक जारी होण्याची शक्‍यता असतांनाच, या याचिकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे. मुख्य परीक्षेच्‍या निकालात सुमारे दोनशे उमेदवार एसईबीसी प्रवर्गातून मुलाखतीसाठी पात्र ठरले असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला आहे. आता या प्रक्रियेमुळे हे उमेदवार भरडले जातील, अशी भितीदेखील व्‍यक्‍त केली जाते आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regarding PSI exam Petition filed in Matt nashik marathi news