सम-विषमचा नियम धुडकावून दुकाने सुरू; महापालिकेकडून कारवाईचा इशारा  

Rejecting the rule of even-odd Shops open on Nashik Road Municipal Corporation warns of action
Rejecting the rule of even-odd Shops open on Nashik Road Municipal Corporation warns of action

नाशिक रोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यासाठी सम-विषमचे नियम दिले होते. परंतु हे नियम अन्यायकारक असून, व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून नुकसानीचे असल्याचे सांगत नाशिक रोड येथील व्यापाऱ्यांनी सोमवार (ता.१०)पासून दोन्ही बाजूंची दुकाने खुली ठेवण्यास सुरवात केली. व्यापाऱ्यांनी प्रशासनाचा आदेश धुडकावला असून, महापालिका कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. 

नियमामुळे मोठे आर्थिक नुकसान

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापाऱ्यांनानी दुकाने सम-विषम या नियमाप्रमाणे सुरू व बंद ठेवावीत, अशा सूचना दिल्या होत्या. या नियमामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने व्यापारी हवालदिल झाले होते. परिणामी याविरोधात रविवारी (ता. ९) सायंकाळी शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर सर्व व्यापारी एकत्र झाले व त्यांनी सम-विषम नियम न पाळता सर्व दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून याच्या अंमलबजावणीला सुरवात झाली.

रविवारी झालेल्या बैठकीला व्यापारी संघटनेचे मनीष घोडके, सुनील बूब, रामेश्वर जाजू, चंदन कलंत्री, वासुदेव आमेसर, मनीष भोजवानी, नितीन चतुर, रवी रामवाणी, बलराम साधवानी, मनीष क्षत्रिय, सुनील पटेल, महेश माळवे आदी उपस्थित होते. या सर्वांनी सम-विषम नियम न पाळण्याचे ठरवून दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास महापालिकेचे विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर पथकासह दुकाने बंद करण्यासाठी गेले असता दुकानदारांनी विरोध केल्याने पथकाला माघारी फिरावे लागले. 

...तर महापालिकेकडून कारवाई 
सम-विषम नियमाचे जो व्यापारी नियम पाळणार नाही त्यांच्याविरुद्ध दंडात्मक किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांनी सांगितले. आमदार राहुल ढिकले यांनी विभागीय अधिकारी मेनकर यांच्याशी संपर्क साधून दुकानदारांवर कारवाई न करण्याची सूचना केली. 
 

संपादन - मनीष कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com