ओबीसींना विश्‍वासात घेऊन मराठा समाजाला आरक्षण : मुख्यमंत्री ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 July 2020

ठाकरे म्हणाले, की ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. तसेच ओबीसी समाजावरही मराठा समाजाच्या आरक्षणामुळे कुठलाही अन्याय होणार नाही.

नाशिक : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्‍वासन मंगळवारी (ता. २१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ओबीसी व भटके विमुक्तांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. या वेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले.

ओबीसींच्या मागणीसाठी सकारात्मक

ठाकरे म्हणाले, की ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. तसेच ओबीसी समाजावरही मराठा समाजाच्या आरक्षणामुळे कुठलाही अन्याय होणार नाही. ओबीसी महामंडळासाठी आर्थिक तरतूद करून जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मंत्रिमंडळातील सर्व सहकारी ओबीसींच्या मागणीसाठी सकारात्मक आहेत. या वेळी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. 

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!

ओबीसी चळवळीतले अनेक नेते व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी

बैठकीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे, ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी चळवळीतले अनेक नेते व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. 

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation for Maratha community by taking OBCs into confidence said by CM Uddhav Thackeray