कोरोनामुळे मार्चपासून पेन्शनअभावी निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल; त्वरित कार्यवाहीची मागणी 

रवींद्र मोरे 
Sunday, 27 September 2020

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये जास्त प्रमाणात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना आता खेड्यांतही घुसला आहे. तो केव्हा हद्दपार होईल तो येणारा काळच ठरवेल. मात्र सर्वसामान्य लोकांचे जनजीवन आजही विस्कळीतच आहे

नाशिक/बिजोरसे : चीनच्या वुहान प्रांतातून निघालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे २४ मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाउन झाला. त्याचा फटका मार्च महिन्यात वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांपासून तर आजतागायत एकाही कर्मचाऱ्याला त्याची हक्काची पेन्शन मिळण्यास बसत आहे. यामुळे निवृत्त झालेल्यांचे पेन्शच्या रकमेअभावी हाल होत आहेत. 

सात महिन्यांपासून कर्मचारी प्रतिक्षेत

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये जास्त प्रमाणात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना आता खेड्यांतही घुसला आहे. तो केव्हा हद्दपार होईल तो येणारा काळच ठरवेल. मात्र सर्वसामान्य लोकांचे जनजीवन आजही विस्कळीतच आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्याने व त्याच महिन्यात वयोमानानुसार शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले. काही कर्मचारी मृत झाले व त्यांची फॅमिली पेन्शन अजून मंजूर झाली नसल्याने कुटुंबियांचेही हाल होत आहेत. पेन्शन नाही म्हणून ग्रॅज्युटीचे पैसे नाहीत, तसेच भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेला पैसा सुद्धा मिळाला नाही. गेल्या सात महिन्यांपासून कर्मचारी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

पेन्शनअभावी हाल

नाशिक येथे वेतन पथक (पे युनिट) च्या कार्यालयात तपास केला असता हे सर्व प्रकरण मुंबई येथे हे (ए.जी.) अकाउंट ऑफ जनरल मत्रांलयात मंजुरी साठी पाठवले असून ते मंजूर झाले तर पेन्शन सुरू होईल. मुंबईला तपास केला असता आता कर्मचारी कामावर यायला लागले असून आम्ही मंजूर करू, असे सांगितले जात आहे. मात्र याचा परिणाम घरात एकच कमावणारी व्यक्ती म्हणजे पेन्शन. त्यात आजारपण. काही कर्मचाऱ्यांची मुले लॉकडाऊन मुळे घरीच असल्याने दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने पेन्शनअभावी हाल होत आहेत. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचारी किशोर आहीरे, व्ही आर शेवाळे, सि टी कापडणीस, वाय. डी. निकम, एस बी निकम, सुरेश जगताप आदींनी केली आहे.  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired employees are in trouble due to lack of pension nashik marathi news