लग्नासाठी म्हणून गेले अन् कोरोनाच घेऊन आले...याला कारण भुसावळ कनेक्‍शन!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

मालेगावनंतर आता भुसावळ कनेक्‍शनमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. मनमाड शहरात कोरोनाचा शिरकाव वाढत चालला असून, शहराची रुग्णसंख्या नऊ झाली आहे. रविवारी (ता. 17) शहरातील एक पोलिस, तर एक नागरिक पॉझिटिव्ह आला होता. त्या नागरिकाच्या घरातील मंगळवारी तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

नाशिक : (मनमाड) नातलगाच्या येथे लग्नाला गेले अन् अचानक लॉकडाऊनच्या घोषणेनंतर तिथचं अडकले...लॉकडाऊन शिथील केल्याने घरी परतले. तर तब्बेत जरा कुणकुणत असल्याने तपासणी केली तर धक्काच...आईसह दोघे मुलेही कोरोना पॉझिटिव्ह...मालेगावनंतर आता भुसावळ कनेक्‍शनमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. मनमाड शहरात कोरोनाचा शिरकाव वाढत चालला असून, शहराची रुग्णसंख्या नऊ झाली आहे. 

नाशिकला उपचार सुरू

रविवारी (ता. 17) शहरातील एक पोलिस, तर एक नागरिक पॉझिटिव्ह आला होता. त्या नागरिकाच्या घरातील मंगळवारी तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. "त्या'चे भुसावळ कनेक्‍शन निघाले असून, आता शहराची रुग्णसंख्या नऊ झाली आहे. मंगळवारी त्यांची पत्नी (वय 50), दोन मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यासह त्याची पत्नी व दोन मुले हे लग्नासाठी भुसावळ येथे गेले होते. अचानक लॉकडाउनची घोषणा झाल्याने ते कुटुंब तिकडेच अडकून पडले. गेल्या आठ दिवसांपूर्वीच ते घरी परतले. तर लक्षणं जाणवल्याने तपासणी केल्यास पॉझिटिव्ह आल्याने या तिघांवर नाशिकला उपचार सुरू आहेत.

हेही वाचा > लॉकडाउनचा येवला बस आगाराला फटका; तब्बल 'इतक्या' कोटींचा तोटा!

शहरातील आनंदवाडी, आययूडीपीसह आंबेडकर चौक हे तीन भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाले असून, त्या तिघांच्या संपर्कातील लोकांना वैद्यकीय तपासणीसाठी नाशिकला पाठविले आहे. मनमाड शहरात कोरोनाचा शिरकाव वाढत चालला असून, मालेगावनंतर आता भुसावळ कनेक्‍शनमुळे रुग्णसंख्या वाढत आहे.

हेही वाचा > रात्री ड्युटीवरून महिला घरी जाताना..वाटेत तिघांनी अडविले..अन् मग....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Returned from Bhusawal His wife, two children corona positive nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: