कुकाणे शिवारातील खुनाचा दोन दिवसांत उलगडा; चौकशीत सत्य आले समोर

प्रमोद सावंत
Saturday, 10 October 2020

कुकाणे (ता. मालेगाव) शिवारातील मोगडी नाला भागात तरुणाचा मृतदेह सापडला होता. स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसांत या खुनाचा उलगडा लावला आहे. आणि चौकशीत समोर आले.

नाशिक / मालेगाव : कुकाणे (ता. मालेगाव) शिवारातील मोगडी नाला भागात तरुणाचा मृतदेह सापडला होता. स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसांत या खुनाचा उलगडा लावला आहे. आणि चौकशीत समोर आले.

खुनाचा दोन दिवसांत उलगडा 

५ ऑक्टोबरला किशोर जगताप (वय ३१, रा. चंद्रमणी- हिंमतनगर, मालेगाव कॅम्प) घरातून बनियन, अंडरपँटवरच बाहेर गेला होता. ६ ऑक्टोबरला कुकाणे मोगडी नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. जलचर प्राण्याने त्याच्या चेहऱ्यावर जखमा केल्या होत्या. तथापि त्याचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. आकस्मिक मृत्यूनंतर मृताचा भाऊ किशोर जगताप यांच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.७) खुनाचा गुन्हा झाला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी याचा तपास केला. चौकशीत ४ ऑक्टोबरला किशोरचे कोणाशी तरी भांडण व वाद झाल्याचे समजले. त्या आधारे पोलिस पथकाने तपासाची चक्रे फिरवून चेतन पवार (२५), हेरंब सोनवणे (१९) व उमेश पाटील (२६, सर्व रा. गल्ली नं. २, हिंमतनगर कॅम्प) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी संशयितांनी किशोरने दारू पिऊन शिवीगाळ केल्याने या तिघांनी त्याला हाताबुक्क्यांनी जबर मारहाण करून गळा दाबून खून केला व दुचाकीवरून कुकाणे शिवारात नाल्यात मृतदेह टाकल्याची कबुली दिली.  

हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

तिघा संशयितांना अटक

गुन्हे शाखा व वडनेर खाकुर्डी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली. किरकोळ कारणवरून झालेल्या वादातून व मृताने दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने हा खून झाल्याचे चौकशीत समोर आले.

हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reveal murder in Kukane Shivara in two days nashik marathi news