जिल्ह्यात मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; १५ डिसेंबरपर्यंत हरकती स्वीकारणार 

विजय पगारे 
Saturday, 28 November 2020

नाशिक जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची नावनोंदणी आणि समाविष्ट नोंदींबाबत आक्षेप, दुरुस्तीसाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

इगतपुरी (नाशिक)  : नाशिक जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची नावनोंदणी आणि समाविष्ट नोंदींबाबत आक्षेप, दुरुस्तीसाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

दावे व हरकती स्वीकारल्या जाणार 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, राज्यात १ जानेवारी २०२१ अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या ५, ६, १२ आणि १३ डिसेंबरच्या सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, प्रारूप मतदार यादीतील नोंदीबाबत दावे व हरकती येत्या १५ डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. मोहिमेसाठी सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रसाठी केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करून यादी अचूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

इथे करु शकता बदल

भारत निवडणूक आयोगाद्वारे www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नावनोंदणीची आणि यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली असून, या सुविधेचाही उपयोग करावा. अधिक माहितीसाठी wwww.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revision program of voter list announced in Nashik district marathi news