ज्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी, त्याच कर्त्या पुरुषाला दिला खांदा; परिसरात हळहळ

अंबादास शिंदे
Monday, 22 February 2021

रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. ज्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्याच कर्त्या पुरुषाच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली. अचानक आलेल्या नियतीच्या घाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काय घ़डले नेमके?

नाशिक रोड : रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. ज्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्याच कर्त्या पुरुषाच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली. अचानक आलेल्या नियतीच्या घाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काय घ़डले नेमके?

ज्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी, त्याच कर्त्या पुरुषाला दिला खांदा

रिक्षाचालक अनिल ठाकरे गोरेवाडी, शस्त्रीनगरमध्ये आई, वडील, पत्नी, दोन लहान मुली आणि दोन भाऊ यांच्यासमवेत राहतात. रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

नाशिक- पुणे महामार्गावरील घटना

नाशिक- पुणे महामार्गावरील बिटको चौकात ही दुर्दैवी घटना घडली.  येथे रविवारी (ता. २१) पहाटे अनिल बाळू ठाकरे (वय ३५, रा. गोरेवाडी, शास्त्रीनगर, नाशिक रोड) रिक्षा (एमएच १५, एफयू ७२७६) घेऊन बिटको पाइंटकडून उड्डाणपुलाखालून जेल रोडकडे जात असताना, दत्तमंदिर चौकातून येणाऱ्या लक्झरी बसने (एमएच ०४, जीपी ०१४४) रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षाचालक अनिल ठाकरे रस्त्यावर पडून जखमी झाले. त्यांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यृ झाला. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी विजय ठाकरे यांच्या तक्रारीवरून लक्झरी बसचालक हसन हुसैन शेख (कुलाबा, मुंबई) याला व बसही ताब्यात घेतली आहे. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

बसचालकास ताब्यात

नाशिक- पुणे महामार्गावरील बिटको चौकात लक्झरी बसने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक ठार झाला. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी बसचालकास ताब्यात घेतले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw driver killed in accident luxury bus nashik marathi news