रिक्षावाल्यांकडून राजरोसपणे प्रवासी वाहतूक...नाशिकला लॉकडाऊन आहे की नाही प्रश्नच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

शहर-जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. असे असतानाही शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. वाहनांची संख्या वाढली आहे. असे असले तरी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. तर खासगी कॅब-टॅक्‍सी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करण्यासाठी अटी-शर्थी आहेत. मात्र रिक्षा प्रवासी वाहतुकीला अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाचे आदेश नाहीत.

नाशिक : लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणण्यात आली असली तरी सार्वजनिक वाहतुकीला परवानगी नाही. त्याचप्रमाणे, प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांनाही परवानगी नसताना शहरात काही रिक्षाचालक मात्र विनापरवानगी प्रवासी वाहतूक करीत आहेत. तसेच, शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी रोड, मेनरोड परिसरातील व्यावसायिकांची दुकाने सुरू झाल्याने नागरिकांची गर्दी वाढली आहे.

रस्त्यांवर वर्दळ वाढली

बुधवारी (ता. 20) महात्मा गांधी रोड, मेनरोड या परिसरात वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे शहरात लॉकडाऊन आहे की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या सोमवारपासून (ता. 18) चौथ्या लॉकडाऊनला प्रारंभ झाला. मात्र या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आलेली आहे. शिथिलता आणण्यात आली असली तरीही शहर-जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. असे असतानाही शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. वाहनांची संख्या वाढली आहे. असे असले तरी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. तर खासगी कॅब-टॅक्‍सी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करण्यासाठी अटी-शर्थी आहेत. मात्र रिक्षा प्रवासी वाहतुकीला अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाचे आदेश नाहीत. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यांपासून रिक्षाचालकांच्या रोजीरोटीवर विपरित परिणाम झालेला आहे.

राजरोसपणे प्रवासी वाहतूक

काही रिक्षाचालकांनी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी फळ-भाजीपाला विक्री सुरू केली. असे असले तरी चौथ्या लॉकडाऊनमध्ये रिक्षाला प्रवासी वाहतुकीची परवानगी नसतानाही काही रिक्षाचालक हे नियमांचे उल्लंघन करीत राजरोसपणे प्रवासी वाहतूक करताना दिसत आहेत. सदरची बाब कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घातक ठरण्याचीच शक्‍यता आहे. 

हेही वाचा > BIG BREAKING : एमएचटी-सीईटीच्या तारखा जाहीर; सत्रनिहाय होणार परिक्षा

बाजारपेठ वाहतूक कोंडी

दुसरीकडे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या एम.जी. रोड आणि मेनरोड परिसरातील दुकाने सुरू झाल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते आहे. या गर्दीमुळे बुधवारी (ता. 20) या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. रणरणत्या उन्हामध्ये ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठेमध्ये लॉकडाऊन असताना काहीसे चैतन्य असले तरी या वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तर, पोलिस प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होते आहे. 

हेही वाचा > महत्वाची बातमी! जूनमध्ये होणारी सेट परीक्षा पुढे ढकलली...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaws started in the nashik city without permission nashik marathi news