esakal | पुनर्पडताळणीत दहावीत नाशिकची रिद्धी अव्वल! गुणवारीत ०.४० ने वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

riddhi 10th.jpg

दहावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर पुनर्पडताळणी प्रक्रियेत रिद्धी राजेंद्र सिंगवी हिच्‍या विज्ञान विषयाच्‍या गुणांमध्ये वाढ झाली आहे. या कामगिरीसोबत ती विभागात अव्वल असल्‍याचा दावा तिच्‍या पालकांनी केला आहे. 

पुनर्पडताळणीत दहावीत नाशिकची रिद्धी अव्वल! गुणवारीत ०.४० ने वाढ 

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : दहावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर पुनर्पडताळणी प्रक्रियेत रिद्धी राजेंद्र सिंगवी हिच्‍या विज्ञान विषयाच्‍या गुणांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी तिला ९९.४० टक्‍के मिळालेले असताना, यात सुधारणा होऊन ९९.८० टक्‍के गुण असलेले गुणपत्रक तिला नुकतेच प्राप्त झाले. दरम्‍यान, या कामगिरीसोबत ती विभागात अव्वल असल्‍याचा दावा तिच्‍या पालकांनी केला आहे. 

गुणवारीत ०.४० ने वाढ झाल्‍याने ९९.८० टक्क्‍यांसह यश 
मराठा हायस्‍कूल येथून शिक्षण घेणारी रिद्धी सिंगवी हिने शैक्षणिक क्षेत्रासोबत क्रीडा क्षेत्रातही भरीव कामगिरी केलेली आहे. ६५ व्‍या शालेय राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती; परंतु कोविडमुळे या स्‍पर्धा होऊ शकल्या नाहीत. नववीत असताना जून २०१८ मध्ये हनुमानगड (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. डिसेंबर २०१८ मध्ये बिलासपूर (छत्तीसगड) येथे झालेल्या ६४ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती.

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

विभागात अव्वल असल्‍याचा दावा

आठवीपर्यंतचे शिक्षण तिने नंदुरबार येथील श्रॉफ हायस्‍कूलमध्ये घेतले आहे. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राप्रमाणे तिने नृत्य व गायन स्पर्धेत यश मिळविले आहे. रिद्धी रोलबॉलची खेळाडू असून जम्परोप, रोप स्किपिंगदेखील राष्ट्रीय स्तरावर खेळली आहे. दुसरीपासून आजवर तिने सात शालेय व दहा संघटनेचे अशा सतरा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, सहा शालेय व तीन संघटनेची पदके पटकावली आहेत.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा