smart city 1.jpg
smart city 1.jpg

स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत कामाला होणार प्रारंभ.. 'या' मार्गावरील वाहतुकीत बदल 

नाशिक : स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत धुमाळ चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला दोन टप्प्यांत प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीच्या मार्गात बदल केल्याची अधिसूचना शहर वाहतूक शाखेने जारी केली.त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिजामाता चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात धुमाळ चौक (वंदे मातरम्‌ चौक) ते जिजामाता चौकापर्यंतचे काम होणार आहे.

या मार्गावरील वाहतुकीत बदल 

या मार्गाचे काम होईपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. जिजामाता चौक ते गाडगे महाराज पुलाकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. धुमाळ चौकातून जिजामाता चौकाकडे फक्त दुचाकी, तीनचाकी वाहने ये-जा करतील. तेथून पर्यायी मार्गाचा वापर करतील. दुसऱ्या टप्प्यात धुमाळ चौक ते जिजामाता चौकाचे काम सुरू झाल्यानंतर हा मार्ग बंद करून मेन रोडच्या धुमाळ चौकाकडून गाडगे महाराज पुलाकडे जाणारी-येणारी वाहतूक गाडगे महाराज पुतळामार्गे बुधा हलवाई मिठाईकडून इतरत्र जातील अथवा रविवार कारंजा-बोहरपट्टीमार्गे-भांडी बाजारमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करतील. धुमाळ चौक ते जिजामाता चौक-सराफ बाजार-प्रकाश सुपारी दुकान ते बादशाही कॉर्नर हा मार्ग नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही नाशिक शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com