स्वस्तात पैठणीचा मोह पडला महागात...येवल्यात येताच व्यापाऱ्यासोबत घडले असे...... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

एखाद्या गोष्टीचा मोह किती महागात पडू शकतो अशी घटना नाशिक-नगर जिल्ह्याच्या सीमेवर घडली. कमी किमतीत पैठण्या देतो, असे आमिष डहाणू येथील व्यापाऱ्याला दाखविले अन् मग घडला असा प्रकार

नाशिक / येवला : एखाद्या गोष्टीचा मोह किती महागात पडू शकतो अशी घटना नाशिक-नगर जिल्ह्याच्या सीमेवर घडली. कमी किमतीत पैठण्या देतो, असे आमिष डहाणू येथील व्यापाऱ्याला दाखविले अन् मग घडला असा प्रकार

असा घडला प्रकार..

डहाणू येथील व्यापारी विकास पाटील यांना एका ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईलच्या माध्यमातून संशयित चव्हाण नामक इसमाने संपर्क करून "तुम्हाला पैठणी साड्या अर्ध्या किमतीत देतो' असे आमिष दाखवित येण्यास सांगितले. संशयिताच्या म्हण्यानुसार विकास पाटील आपल्या पत्नीसह नाशिक- नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ओगदी ते बोकटे येथे येताच संशयितांने रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पाटील यांना बोलावून घेतले. यावेळी चव्हाण याने त्याच्या दहा-बारा साथीदारांसह लाकडी दांडके, चाकूचा धाक दाखवून ठार करण्याची धमकी देऊन पाटील यांच्याजवळील चार लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. 

हेही वाचा > अंधश्रध्देचा खेळ आणि राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश..मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यासह १९ जण सामील

पोलीसांत गुन्हा दाखल

एखाद्या गोष्टीचा मोह किती महागात पडू शकतो अशी घटना नाशिक-नगर जिल्ह्याच्या सीमेवर घडली. कमी किमतीत पैठण्या देतो, असे आमिष डहाणू येथील व्यापाऱ्याला दाखवित त्याला येवल्यात येणाऱ्या सांगूत तो जिल्ह्याच्या सीमेवर येताच बारा लोकांनी त्याच्याकडील रोख रकमेसह सोन्याचे दागिन्याची अशी चार लाख 77 हजार 500 रुपयांची लूट केली. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अनकाई (ता. येवला) येथील संशयित आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विकास पाटील हे घटना घडल्यानंतर येवला पोलिस ठाण्यात तक्रार देण्याकरीता गेले असता घटना कोपरगाव तालुक्‍यात घडल्याने त्यांना पुन्हा कोपरगाव तालुका पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संशयित चव्हाण यासह बारा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा > भुजबळ संतापले...अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नेमके काय घडले?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery of Dahanu trader in Yeola nashik marathi news