ह्रदयद्रावक! फोनवर सई रोज म्हणायची, "मम्मा लवकर ये.. अन् आज तब्बल महिनाभरानंतर भेटले तेव्हा..

shubhangi ahire.png
shubhangi ahire.png

नाशिक / मालेगाव : फोनवर बोलताना सई रोज म्हणायची, "मम्मा लवकर ये...' तिच्याशी बोलताना रोज कंठ दाटून यायचा... आज तब्बल महिन्यानंतर तिला भेटतेय, हे सांगताना डॉ. शुभांगी अहिरे यांना अश्रू अनावर झाले होते. येथील सामान्य रुग्णालयात कान-नाक-घसातज्ज्ञ असलेल्या डॉ. अहिरे रविवारी (ता. 3) दुपारी सटाणा नाका भागातील निवासस्थानी परतल्या. त्यावेळी परिसरातील रहिवाशांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले. 

तब्बल महिन्यानंतर चिमुकल्या सईची भेट 
"सकाळ'शी संवाद साधताना डॉ अहिरे यांनी बालपणातील संस्कार, सेवेची उर्मी, जनतेचे पाठबळ व आशीर्वाद यातूनच मला हे रुग्णसेवेचे पाठबळ मिळाले. कोरोना संसर्गातील रुग्णांची सेवा हे माझे कर्तव्यच आहे. माझ्यासारखे असंख्य डॉक्‍टर व परिचारिकांनी या कामात झोकून दिले आहे. आज तब्बल महिन्यानंतर माझ्या चिमुकल्या सईला भेटतेय, हा आनंदच अवर्णनीय आहे. 

मालेगावमध्ये डॉक्‍टरांचे नागरिकांनी केले पृष्पवृष्टीने स्वागत 
नगरसेवक मदन गायकवाड यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी डॉ. अहिरे यांच्या स्वागतासाठी टाळ्यांचा वर्षाव आणि सोसायटीत रांगोळ्या काढल्या होत्या. तनिष्का सदस्या व त्यांच्या मातोश्री विजयालक्ष्मी अहिरे यांनी, महिन्यानंतर ती परतली यामुळे कुटुंबीयांना वेगळाच आनंद झाला. रुग्णालयात असताना बोलणं व्हायचं; पण आज मायलेकींची प्रत्यक्ष भेट झाली याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. डॉ. शुभांगी यांना सई (वय 6) व साई (वय 12) अशी दोन मुले आहेत. स्वागत झाल्यानंतर रविवारी याच सोसायटीतील डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सर्वांचे समुपदेशन व घ्यावयाची काळजी, हे सांगण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com